नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद शहर वाहतुक शाखा क्रमंाक 1 आणि इतवारा वाहतुक शाखा क्रमांक 2 यांनी एका दिवसात 389 मोटार वाहन अधिनियमाचे खटले दाखल करून 5 लाख 30 हजार 700 रुपये दंड आकारला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात बिना परवाना चालणारे ऍटो, गणवेश परिधान न करता ऍटो चालविणारे चालक यांच्या संदर्भाने 11 एप्रिल रोजी एक मोहिम राबविण्यात आली. वजिराबादचे पोलीस निरिक्षक साहेबराव गुट्टे अणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार यांनी वजिराबाद चौक, रेल्वे स्थानक, महाराणा प्रताप चौक, तरोडेकर मार्केट, कलामंदिर येथे कार्यवाह्या केल्या. त्यात ट्रीप सिट केसेस-21 दंड 21 हजार, गणवेश परिधान न करणारे ऍटो चालक केसेस-52 दंड 44 हजार, अनपेड केसेस 195 दंड 3 लाख 30 हजार 250, ई चलनद्वारे पेड केसेस 11 दंड 8 हजार 250, ऑनलाईन चलनाद्वारे केसेस-7 दंड 14 हजार 950 अशा एकूण 286 केसेस करून 4 लाख 18 हजार 450 रुपये रोख दंड आकारला आहे.
वाहतुक शाखा क्रमांक 2 इतवाराचे पोलीस निरिक्षक जगनाथ पवार आणि त्यांच्या सहकारी पोलीसा अंमलदारांनी देगलूर नाका, जुना मोंढा, बाफना टी पॉईंट या ठिकाणी कागदपत्र तपासणी, विना परवाना चालणारी वाहने, भरधाव वेगाने चालणारी वाहने, गणवेश परिधान न करता ऍटो चालविणारे चालक अशा एकूण 103 केसेस करून एकूण 1 लाख 12 हजार 250 रुपय दंड आकारला आहे.
दोन वाहतुक शाखांनी 5 लाख 30 हजार 700 रुपयांचा दंड आकारला

Leave a Reply