४५ दिवसात २७ जिल्हे केला प्रवास.
नांदेड:- संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज यांच्या स्वच्छतेचा व सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवड येथील अवलियाने स्वच्छतेचा व प्लास्टीक पिशवी मुक्तीचा जागर करण्यासाठी चक्क मोटारसायकल वर महाराष्ट्र भर फिरुन प्रचार व प्रसार करत जनजागृती सुरू केली आहे. यशवंत कान्हेरे असे या अवलियाचा नाव असून ते ६९ वर्षे वयाचे आहेत. त्यांचा हा मोटारसायकल वरील प्रवास व अनुभव आजच्या पिढीला नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असलेले यशवंत कन्हेरे हे ५२ वर्षीच एका खाजगी बजाज कंपनीतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन प्रदुषण, कचऱा, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाॅटल अशा प्रकारच्या अवास्तव व चुकीच्या पध्दतीने वापर होत असल्याने होणारी पर्यावरणाची हानी, मनुष्यावर होणारा दुष्परिणाम याची माहिती सांगत जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा जागर पिंपरी चिंचवड पुर्ता मर्यादीत राहिलेला नसून ते संपूर्ण महाराष्ट्र भर स्वच्छतेचा प्रचार करत आहे.त्याच बरोबर त्यांनी आता चक्क मोटारसायकल वर राज्यभर प्रवास करत जनजागृती करत आहेत.यशवंत कन्हेरे यांनी संत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून २४ फेब्रुवारी २०२५ पासून पिंपरी चिंचवड येथून मोटारसायकल वर जनजागृती साठी सुरूवात केली आता रायगड, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, गडचिरोली, नागपुर, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, जालना, परभणी, हिंगाेली असा प्रवास करत नांदेडला पोहंचले आहेत. ४५ दिवसात कन्हेरे यांनी तब्बल २७ जिल्ह्यात पोहंचले आहेत, पुढील २० दिवसात ते उर्वरित जिल्हे पुर्ण करणार आहेत.
यशवंत कन्हेरे हे दररोज सकाळी सात ते दुपारी १२ पर्यंत प्रवास करुन ठिकठिकाणी संस्था, शाळा, सार्वजनिक ठिकाणी, स्वच्छतेचे व प्रदुषण मुक्ती संदर्भात काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करतात तसेच स्वतः स्वच्छता करतात. हेल्मेट वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, ओला कचरा, कोरडा कचऱ्याचं वर्गीकरण करा अशा पध्दतीच्या संदेश फलक घेऊन ही ते प्रसार करत आहेत.६९ व्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत राज्यभर मोटारसायकल वर स्वच्छतेचा जागर करत प्रवास करणाऱ्या यशवतं कन्हेरे यांचा हा प्रवास इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
उद्याचे समृध्द राष्ट्र बनवायचा असेल तर स्वच्छता, प्रदूषण तसेच प्लास्टिक मुक्तीचा जागर होण्याची गरज आहे. यशवंत कन्हेरे यांनी नांदेड च्या शाळा , हॉटेल स्वछता. करतं नांदेड शहरातील बाबा नगर भागातील महात्मा फुले हायस्कूल मध्ये स्वच्छतेचा व प्रदुषण, प्लास्टिक मुक्तीचा जागर कार्यक्रम करतांना यशवंत कन्हेरे हे विद्यार्थांना मार्गदर्शन केलें आहे .विशेषतः तरुणांमध्ये या जनजागृतीची गरज असल्याचे मत यशवंत कन्हेरे यांनी बोलताना व्यक्त केले.
Leave a Reply