नांदेड(प्रतिनिधी) -शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी इंडियन फारमर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटिव लिमिटेड (आयएफएफसीओ) च्यावतीने अनेक सुविधा चालविल्या जातात. त्यात खत पुरवठा सुध्दा आहे. वास्तव न्युज लाईव्हाला प्राप्त झालेल्या दोन जैविक खत उत्पादन व पुरवठा संस्थांच्या प्रमाणपत्रात आयएफएफसीओने त्यांना धाऊक विक्री नाकारलेली असतांना ते धाऊक विक्री करतात ही माहिती प्राप्त झाली आहे.
आयएफएफसीओ आपल्या एजंटांना प्रमाणपत्र देते त्यात त्यांना काय सुविधा आहेत आणि त्यांनी काय करायला हवे. याचे विवेचन आहे. नांदेड येथील केदारनाथ जैविक खते उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था मर्यादीत नांदेड आणि देवगिरी जैविक खते उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था मर्यादीत नाही. यांचे ते प्रमात्र अवलोकीत केले असता. फॉर्मओवर हे प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यासाठी काद्यातील कलम 8 आणि 11 पाहा असे लिहिलेले आहे. या प्रमाणपत्रात दुसऱ्या कॉलममध्ये त्या जैविक खत संस्थेचे काय अधिकार आहेत याचा उल्लेख केलेला आहे. त्यात धाऊक विक्रेता या शब्दासमोर नका आहे. किरकोळ विक्रेता या शब्दासमोर होकार लिहिलेला आहे आणि औद्योगिक विक्रेता या शब्दासमोर सुध्दा नकार दिलेला आहे. याचा अर्थ ज्या सोसायट्यांना आयएफएफसीओ खताची एजन्सी देते त्यांनी फक्त शेतकऱ्यांना आणि किरकोळ पध्दतीने त्या खतांच्या बॅगा विक्री करायला हव्यात असा या प्रमाणपत्राचा अर्थ असल्याचे खत व्यवसायीक सांगतात.
कालच आम्ही एका संस्थेच्या तेरिज पत्राचा उल्लेख करून बातमी प्रसारीत केली होती. त्यामध्ये 18 हजार रुपये भाग भांडवल असलेली ती सोसायटी 106 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा टर्नओव्हर करते हे दिसते. सोबतच लेखा परिक्षणामध्ये अनेक त्रुट्या असतांना सुध्दा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही. लेखा परिक्षणात याचाही उल्लेख आहे की, त्या संस्थेने शिक्षण निधी भरलेला नाही. एकुणच खत सोसायट्या आणि त्याला जोडून असणारे अनेक व्यवसाय हे एकाच व्यक्तीशी संबंधीत असल्याने त्या एकाच व्यक्तीकडे त्याचा फायदा जात आहे. जसे खत सोसायटीकडून धाऊक खत विक्री एकाच दुकानाला होते. रॅकवर येणारे खत कधीच सोसायटीत येतच नाही. रॅकवरूनच थेट विक्री होते. कागदोपत्री मात्र त्याची वेगवेेगळी बिले बनवली जातात. रॅकवरून खत उचलण्याच्या वाहतुक व्यवसाय सुध्दा एकाच व्यक्तीकडे आहे. त्यामुळे तो छोट्याा किरकोळ विक्रेत्यांना त्यांचे खत वेळेत पोहचणार नाही याच्यासाठी धडपड करतो. त्यामुळे त्याची ग्राहकी खराब होते आणि पुन्हा ती ग्राहकी त्याच व्यक्तीकडे जाते असा एकंदरीत प्रकार आहे.
आयएफएफसीओ दिलेल्या खतांची नोंदणी का घेत नाही हा एक मोठा विषय यात आहे. खत सोसायट्या धाऊक विक्रेत्याला खत विकतात. धाऊक विक्रेता किरकोळ विक्रेत्यांना खत विकतो आणि त्या किरकोळ विक्रेत्याकडून जिल्हा परिषद आणि कृषी विभाग त्याच्या वाटपाचा कार्यक्रम लिहुन घेते. एजन्सी ज्या सोसायटीकडे आहे खरे तर खत वाटपाचा कार्यक्रम त्यांच्याकडूनच घ्यायला हवा. काही दिवसांपुर्वीच नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पुरवठा केलेल्या ठिबक सिंचन संचाची अयोग्य तपासणी केल्यामुळे असंख्य कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील दोघांना सोडून देण्याचे पत्र कृषी संचालकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर दिले आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना फायदे देण्यासाठी तयार असलेल्या योजनांचा फायदा काही निवडणक लोकच घेत आहे असा या एकंदरीत प्रकारावर शासनाचे लक्ष नाही ही दुर्देवाची बाब आहे.
संबंधीत बातमी…
Leave a Reply