नांदेड,(प्रतिनिधी)- प्रमाणिकपणा हा हल्ली दुर्मिळ होत चाललेला गुण आहे. असे असले तरी समाजामध्ये अनेक लोक चांगले व प्रमाणिक आहेत. याचाच सुखद अनुभव अँटो चालकांकडून नांदेडकरांना येत आहे. त्यात एक आणखी एका अनुभवाची दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी शनिवारी भर पडली. टायगर ऑटो रिक्षा संघटनाचे दक्षिण शहर उपाध्यक्ष रिक्षा चालक पिंटू गजभारे यांच्या रिक्षामध्ये एक मोबाईल रियल मी कंपनीचा किंमत 16,000 रुपये किंमतीचा प्रवासी विसरल्याची घटना घडली. कालेजची विद्यार्थीनी प्रवासी ममता वाघमारे राहणार धनेगाव नांदेड ही महिला धनेगाव लातूर फाटा ते नेहरू कालेज प्रवासादरम्यान रिक्षामध्ये मोबाईलवर बोलून मोबाईल रिक्षामध्ये गहाळ झाला. उतरून घरी जात असताना लक्षात आले की मोबाईल रिक्षामध्येच गहाळ झाला आहे. घरी गेल्यावर मोबाईलवर संपर्क केला असता रिक्षा चालक पिंटू गजभारे यांनी फोन उचलला रिक्षा चालक गजभारे लगेच संघटना चे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा)फोन केला. रिक्षा मध्ये मोबाईल सापडले आहे. नंतर फोन उचलला आणि सांगितलं की मी सिडको कडे आहे आणि मी आमचे टायगर संघटना अध्यक्ष अहेमद (बाबा )यानी लगेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिचोंळकर यांना माहिती दिली.लगेच मोबाईल परत करतांना पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांनी रिक्षा चालकाचा सत्कार केला. तेव्हा टायगर संघटनाचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा)बागवाले, प्रदेश उपाध्यक्ष शेख तय्यब,रिक्षा चालक पिंटू गजभारे,जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, साजित राज आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply