नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड-कलंबर रस्त्यावरील एक बिअर शॉपी फोडून चोरट्यांनी रोख 25-30 हजार रुपये चोरून नेले आहेत.
परमेश्र्वर साहेबराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मार्चच्या रात्री 11 ते 10 मार्चच्या सकाळी 6 वाजेदरम्यान कलंबर रस्त्यावर असलेल्या त्यांच्या मालकीच्या देशमुख बिअर शॉपीचे शटर तोडून कोणी तरी चोरट्यांनी गल्यातील 25-30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. या संदर्भाने सोनखेड पोलीसांनी गुन्हा क्रमांक 81/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply