आज सत्तेत नसलेल्या झालावाडच्या महाराणी जेंव्हा रागावतात तेंव्हा जयपुर ते दिल्ली हादरून जाते. ही असते ताकत जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या नेत्याची. भारतीय जनता पार्टीने मागील काही वर्षापासून अडगळीत टाकलेल्या महाराणी वसुंधरा राजे सिंधीया आपल्या मतदार संघात पाण्यासाठी ओरड करणाऱ्या जनतेची दखल सामाजिक संकेतस्थळापवर घेतात आणि जयपुर ते दिल्ली हादरून टाकले. भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य अध्यक्ष पदाच्या चर्चांमध्ये महाराणींचे नाव सुध्दा आहे.
राजस्थानमधील झाडावाड या राज्याच्या महाराणी वसुंधरा राजे सिंधीया या 2 वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या. पाच वेळेस झालावाड या मतदार संघातून खासदार होत्या. पाच वेळेस त्याच मतदार संघातून आमदार होत्या. 2004 पासून त्यांचे पुत्र दुष्यंत झालावाडचे खासदार आहेत. महाराणी वसुंधरा राजे काल -परवा झालावाड मतदार संघातील रायपूर या गावात जन अदालत सुरू होती. त्या ठिकाणी जनता अधिकाऱ्यांना रडून रडून सांगत होती की, सध्या एप्रिल महिना आहे. पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. हा घटनाक्रम पाहुन महाराणी वसुंधरा राजे यांना सुध्दा राग आला. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले तरी पण महाराणी यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
त्यानंतर महाराणी यांनी एक्स हॅंडवर पोस्ट केली की, तहान फक्त काय जनतेलाच लागते, अधिकाऱ्यांना लागत नाही काय? पिण्याच्या पाण्यासाठी जनता अतृप्त आहे. पाणी कागदावर दाखविण्यापेक्षा जनतेच्या ओठांपर्यंत गेले पाहिजे. अधिकारी झोपलेले आहेत आणि जनता मात्र रडत आहे. हे मी होवू देणार नाही. माझ्या धैर्याची परिक्षा घेवू नका. प्रधानमंत्री जलजीवन मिशन योजनेसाठी 42 हजार कोटी रुपये दिले आहेत. मी एक-एक पैशांचा हिशोब घेईल. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असे घडत आहे. सध्या एप्रिल महिना सुरू आहे. पुढे मे, जून, जुलै या दिवसांमध्ये काय अवस्था होईल. राजस्थानचे मंत्री कन्हैया लाल यांनी महाराणींच्या ट्विटवर उत्तर दिले की, 50 टक्के गावात पाणी नाही. त्यांनी लगेच आपले सर्व दौरे रद्द करून जयपूर गाठले आणि तेथे अधिकाऱ्यांसोबत बैठका घेवून पाण्याच्या विषयावर चर्चा केली. याचा अर्थ महाराणींचा राग वाजवीच होता.
महाराणी यांच्या ट्विटचे दिल्लीत सुध्दा पडसाद उमटले. केंद्रीय जनशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी महाराणी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले आणि मी राजस्थान सरकारकडून अहवाल मागवला आहे. त्यावर कार्यवाही होईल असे रि ट्विट केले. सन 2024 मध्ये जलजीवन मिशनसाठी राजस्थानला 42 हजार कोटी रुपये देण्यात आले होते. या निधीतून राजस्थानच्या प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचा नळ द्यावा अशी ती योजना आहे. आता सध्या 2025 सुरू आहे. पण 1778 एवढ्या गावांमध्ये ही योजना पुर्ण करायची होती. परंतू फक्त 515 गावांमध्ये हे काम पुर्ण झाले आहे. 900 गावांमध्ये काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 1091 गावांमध्ये वर्क ऑर्डर दिली असा कांगावा राजस्थान सरकार करत असली तरी ते काम कधी पुर्ण होईल ते तर सांगणे अवघडच आहे. त्यामुळे महाराणी वसुंधरा राजे सिंधीया यांना आलेला राग बरोबरच आहे.
महाराणींचे धैर्य संपले तेंव्हा कॉंग्रेसने सुध्दा याचा फायदा घेतला.कॉंगे्रसने सुध्दा फायदा घेणे अपेक्षीतच होते. राजस्थानचे विरोधी पक्ष नेता टीकाराम जुल्ली यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात पिण्याच्या पाण्याची ही अवस्था असेल तर राजस्थानचे काय हाल असतील अशा भावना व्यक्त केल्या. महाराणींना त्यांचे सरकार असतांना सोशल मिडीया माध्यमातून आपल्या मागण्या जाहीर कराव्या लागतात म्हणजे हे सरकार किती अपयशी आहे असा उल्लेख टिकाराम यांनी केला. राजस्थानमधील कॉंगे्रस नेते गोविंदसिंह यांनी महाराणी वसुंधरा राणी सिंधीया यांचे धन्यवाद व्यक्त करून राज्य शासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राजस्थानमध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडूण आलेल्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री करून एक विनोदच केला आहे.
महाराणी वसुंधरा राणी सिंधीया यांना हाच राग आला असे नाही. त्यांना अनेकदा राग आलेला आहे आणि त्यांच्या रागाची दखल घ्यावीच लागलेली आहे. भाजपने त्यांना अडगळीत टाकले तेंव्हा त्यांनी विविध मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी एक दौरा आयोजित केला तेंव्हा भाजपच्या लोकांनी त्यांच्यावर शक्ती प्रदर्शनाचा आरोप केला होता. तेंव्हा महाराणी म्हणाल्या. हे शक्ती प्रदर्शन नाही तर भक्ती प्रदर्शन आहे. जनता मला भेटायला येते तर मी काय करू. त्यावेळी भारतीय जनता पार्टीने त्यांना व्यासपीठावर सुध्दा कोपऱ्यात बसविण्याची सुरूवात केली होती. त्यांना भाषण करण्यासाठी संधी दिली जात नव्हती. महाराणींनी एकदा असे सांगितले होते की, सत्ता, उंची आणि मस्ती या तिघांवर लक्ष ठेवा. सत्ता आणि मस्ती संपत असते. परंतू उंची कधी संपत नाही आणि ती उंची तुमच्या स्वत:च्या कर्तत्वाने उभे राहते. सध्याच्या परिस्थितीत भाजपच्या अध्यक्ष पदाचे नाव जाहीर झालेले नाही. त्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराणी वसुंधरा राजे सिंधीया यांना भेटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनजी भागवत सुध्दा राजस्थानला महाराणी यांच्या भेटीसाठी गेले होते. याच पार्श्र्वभूमीवर महाराणीने एक्स हॅंडलवर केलेल्या ट्विटमुळे जयपूर ते दिल्ली हादरली आहे.
Leave a Reply