नांदेड(प्रतिनिधी)-शासनाच्यावतीने आयएफएफसीओ या खत कंपनीकडून मिळणाऱ्या खताच्या वाटपासंदर्भाने होणाऱ्या गोंधळाची परिभाषा वास्तव न्युज लाईव्हने कालच केली होती. आयएफएफसीओ कंपनीकडून आणि इतर कंपन्यांकडून खत घेवून ते वाटप करणाऱ्या सोसायट्या पैकी देवगिरी जैविक खते उत्पादक व पुरवइा सहकारी संस्था मर्यादीत नांदेड यांचा लेखा परिक्षण अहवाल प्राप्त झाला . यामध्ये 18 हजार रुपयांच्या भागभांडवलावर सुरू झालेली ही सोसायटी वर्षभरात 106 कोटी 7 लाख 4 हजार 809 रुपयांचे तेरिज पत्रक लेखा परिक्षणात सादर केले आहे. हा आम्ही लिहित असलेला भाग एका सोसायटीचा आहे. राज्यात अशा किती सोसायट्या असतील. याचा अंदाज वाचकांनी लावावा. लेखा परिक्षणात नमुद केलेल्या चुकीच्याबाबत कोणती कार्यवाही या खत सोसायट्यांवर झाली. याचा सुध्दा काही उल्लेख आजपर्यंत सापडला नाही.
देवगिरी जैविक खते उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था यांच्या लेखा परिक्षणामध्ये संस्थेचे उद्देश लिहिलेले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यकत्या गरजा भागविणे व विविध उपक्रम हाती घेवून शेतकऱ्यांची सर्वांगिण उन्नती करणे हा एक उद्देश आहे. पण शेतकऱ्यांच्या लुटीशिवाय काहीच केले जात नाही. असे या तेरीज पत्रकावरुन दिसते. लेखा परिक्षणातील कलम 49(अ) पोट कलम 10 नुसार नफा काढण्यापुर्वी कोणत्याही तरतुदी केलेल्या नाहीत असा उल्लेख आहे. तसेच विविध कलमांचा उल्लेख करून संपूर्ण उद्देशांची पुर्तता केलेली नाही. हातातील शिल्लक मर्यादेत ठेवलेली नाहीत. संपुर्ण हिशोब पुस्तीका ठेवलेल्या नाहीत. तसेच कलम 73 प्रमाणे शिक्षण निधी वार्षिक अंशदान भरणा केलेला नाही. या सोसायटीमध्ये खरेदीवरील सुट हेच संस्थेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत लिहिलेले आहे.
सभासदांचा भाग 18 हजार रुपये असतांना तेरीज पत्रक मात्र 106 कोटीपेक्षा जास्तचे आहे. त्यामध्ये सुध्दा काही कर्ज घेतलेले आहे. त्यामध्ये कर्जापेक्षा भरलेली रक्कम 1 कोटी 49 लाख 54 हजार 255 रुपये अधिक भरणा केलेली आहे. त्यामुळे कॅश क्रेडीट कर्ज खात्याचा नियमाप्रमाणे वापर करावा असा शेरा लेखा परिक्षकाने लिहिला आहे. सोसायटी यांची, खताचे गोडाऊन यांचे, खताची वाहतुक यांची या सर्वच बाबी एकाच व्यक्तीकडे आहेत. परंतू या सोसायटीच्या उद्देशांमध्ये सोसायटीशी संबंधीत व्यक्तीला व्यवसाय करता येत नाही. हा उद्देश म्हणजे एकाच जागेतून दोनदा नफा घेण्यावर निर्बंध आणण्यासाठी आहे. परंतू त्याचे पुर्णपणे उल्लंघनच होते. लेखा परिक्षणामध्ये कोणाच्या नावाने काय कारभार चालतो. याचा काही एक स्पष्ट उल्लेख नाही. मागील लेखा परिक्षण अहवालातील दोष दुरूस्ती अहवाल सुध्दा सादर केलेला नाही. देवगिरी या संस्थेची सभासद संख्या फक्त 18 आहे. तरीपण हा कारभार चाललेला आहे. अनेक विषयांमध्ये लेखा परिक्षकाने भरपूर त्रुटी काढल्या आहेत. परंतू यावर कार्यवाही कोण करते याची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता. ती मिळू शकली नाही.
खत विक्री परवाना कृषी विभागाचे अधिक्षक देतात. सोसायटीची नोंदणी जिल्हा उप निबंधकांनी केली आहे. लेखा परिक्षण अहवाल तयार झाल्यावर तो अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे जातच असेल. परंतू आजपर्यंत कोणत्याही खत सोसायटीवर कार्यवाही झाल्याचे कोणी सांगत नाही. म्हणजे सर्व काही आलबेल चालले आहे काय? लेखा परिक्षणात तर हजारो त्रुटी आहेत. मग त्या त्रुटींची पुर्तता कोण करेल. आम्ही लिहिलेल्या कर्जाच्या प्रकरणात कर्जाच्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम सोसायटीने बॅंक खात्यात जमा केलेली आहे. हा तर अभिलेख आहे मग यावर कार्यवाही का नाही होत हा प्रश्न आम्ही नांदेड जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित करत आहोत.
खत विक्री सोसायटीच्या लेखा परिक्षण अहवालामध्ये अनेक त्रुटी असतांना सुध्दा त्यांच्यावर कार्यवाही होत नाही

Leave a Reply