नांदेड,(प्रतिनिधी)-10 एप्रिल रोजी एका 65 वर्षीय अनोळखी माणसाचा मृतदेह न्यायालयासमोरच्या फुटपाथ वर सापडला आहे. वजीराबाद पोलिसांनी या संदर्भाने शोध पत्रिका जारी केली आहे.
दिनांक 10 एप्रिल रोजी परसराम मारुती चौधरी यांनी दिलेल्या खबरीनुसार न्यायालयासमोरच्या रस्त्यावर जवळ असलेल्या फुटपाटवर एक 55 ते 60 वर्षीय वयोगटाचा माणूस मरण पावलेला आहे. या संदर्भाने वजीराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 25 /2025 दाखल करण्यात आला आहे. या अकस्मात मृत्यूच्या तपासाची जबाबदारी पोलिस अंमलदार एस.जी.सोनटक्के यांच्याकडे देण्यात आली आहे. वजिराबाद पोलिसांनी या मृत्यू संदर्भाने एक शोध पत्रिका जारी केली आहे. त्यानुसार मरण पावलेल्या व्यक्तीचे वय 55 ते 60 वर्ष असावे. त्यांचा रंग सावळा आहे. चेहरा लांबट आहे. नाक सरळ आहे. उंची अंदाजे साडे पाच फूट आहे. शरीर बांधि सडपातळ आहे. त्यांनी अंगावर राखाडी काळया निळ्या पिवळ्या रंगाचे पट्टे असलेला टी-शर्ट परिधान केलेला आहे. दाढी व मिशी बारीक ठेवलेली आहे. जनतेपैकी कोणाला बातमीतील वर्णनासारखा माणूस,त्यांची ओळख आणि त्याच्या मृत्यू बद्दलची माहिती असेल तर त्यांनी वजिराबाद पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वजीराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले आहे. या मृत्यू संदर्भाची माहिती वजिराबाद पोलीस ठाण्याचा क्रमांक 02462 -236500,पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांचा मोबाईल क्रमांक 8693828777 आणि पोलिस अंमलदार एस.जी. सोनटक्के यांचा मोबाईल क्रमांक 8805007511 यावर सुद्धा देता येईल.
Leave a Reply