नांदेड :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह मध्ये विसावा हॉटेल येथील सभागृहामध्य मनी मार्जीन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे अध्यक्ष एस.जी. माचनवार तर प्रमुख पाहुणे गणपत धोंडीबा गायकवाड होते.
तसेच नांदेड जिल्हयातील संचित बचतगटाचे अध्यक्ष शंकर नामदेव गच्चे व सचिव मारुती भुजंगराव कदम हे उपस्थित होते . तसेच स्वप्नपुती महिला बचत गटाचे अध्यक्ष, मीनाक्षी शंकर गच्चे सचिव, पंचपुला वाघमारे व इतर सदस्य उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयील आर.एल.नागुलवार यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.
या एक दिवसीय मनीमार्जीन कार्यशाळा अध्यक्ष एस.जी. माचनवार यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन उदघाटन करण्यात आले.
जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सहभागी 40 ते 50 लाभार्थी यांना आर. एल. नागुलवार यांनी मनी मर्जीनचे महत्व सांगून मार्गदशन केले व समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली .
मनी मार्जीन एक दिवसीय कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक श्रीमती सुजाता पोहरे , जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी यांनी समाज कल्याण कडून लघु उदयोगासाठी मानी मार्जीन बाबत संपूर्ण माहिती देवून तळा गाळातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लोंकाना समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देवून समाज कल्याण विभागाची माहिती पुस्तीका दिली . तसेच संविधान उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले.
ही एक दिवसीय मनीमार्जीन कार्यशाळा यशस्वी करण्या करिता नरेंद्र मस्के, कनिष्ठ लिपीक व दिगांबर पोतुवार, समतादुत यांनी परिश्रम घेतले. सदर एक दिवशीय कार्यशाळा शिवानंद मिनगीरे ,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .
Leave a Reply