Advertisement

संविधान बदलण्याच्या वेगवेगळया पध्दती अवलंबणाऱ्या भाजपने आता डॉ.बी.आर.आंबेडकर सन्मान अभियानची सुरूवात केली

राहुल गांधी सांगतात भारतीय संविधान प्रत्येकाला अधिकार देतो. परंतू सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अधिकार देणे पसंत नाही. काही महिन्यापुर्वीच आंबेडकर..आंबेडकर…आंबेडकर… असे शब्द उच्चारून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची बेअबु्र सर्व देशभरात विरोध प्रदर्शनाने गाजली. पण आता 4 दिवसात महामानव डॉ.बी.आर.आंबेडकरांची 137 वा जन्मोत्सव येत आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने डॉ.बी.आर.आंबेडकर सन्मान अभियान सुरू केले आहे. हे अभियान म्हणजे वेळोवेळी शासनाने संविधान बदलाचा जो प्रयत्न केला त्याला सारवा सारव करण्याचा हा प्रकार आहे.
काल-परवाच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि संघटन महामंत्री बी.एल.संतोष यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना अत्यंत टोकाचे आदेश दिले आहेत. ज्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संविधान, आदिवासी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या संदर्भाने बोलतांना आपल्या तोंडावर कुलूप लावावे असे आदेश भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना देण्यात आले आहेत. नाही तर या पुर्वी संविधान बदलायचे आहे, ते पुर्णपणे बदलावे लागेल, नेहरुने संविधान बदलले तर आम्ही सुध्दा बदलू अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते बोलत होते. मागेच कुंभमेळा झाला. या मेळ्यात धर्म संसदेने सुध्दा संविधान बदलाची भाषा केली आहे आणि ती पुर्ण करायची आहे असे पण जाहीर केले आहे. नवीन संविधान मनुस्मृतीसारखे तयार आहे असे सुध्दा धर्मसंसदेने सांगितले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती आणि त्या विरोधात कोण-कोण काय बोलले होते हे अभिलेखावर आहे आता आम्हाला लिहिण्याची गरज नाही. केेंद्र सरकार मात्र प्रत्येक बिल पहिले पंतप्रधान पंडीत जवारलाल नेहरु यांच्या नावाने फाडते. पण त्यामुळे काह ही खुप मोठा प्रभाव पडेल असे आम्हाला वाटत नाही. पंडीत नेहरुंच्या तीन पानांमध्ये लिहिलेल्या एका पत्रातील एक वाक्य वाचून ते बिल फाडण्याचा प्रयत्न होतो. परंतू भारतात विद्वानांची कमतरता नाही. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी लिहिलेले संपुर्ण पत्र लोकांना तोंड पाठ आहे. त्यामुळे एका वाक्याचा निगेटीव्ह प्रचार चालणार नाही.
मोदीच्या घरातून अर्थात गुजरातमध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रसचे अधिवेशन घेवून कॉंगे्रस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, खा.राहुल गांनी यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की, आम्ही आजही संविधानाप्रमाणे चालतो. संविधान आम्हाला समानता, स्वातंत्र्य देते. पण भारतीय जनता पार्टीकडे फक्त शत्रुता पसरविण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे आणि त्या मार्गावरच ते मार्गक्रमण करतात याचे उदाहरण सांगतांना खा.राहुल गांधी यांनी सांगितले की, राजस्थानमधील कॉंगे्रस नेते टिकाराम जुली हे एका मंदिरात दर्शनासाठी गेले. तेंव्हा त्या ठिकाणच्या भाजप नेत्यांनी ते मंदीर धुवून काढले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्र्रवेशासाठी केलेल्या आंदोलनाचा विसर भाजपला पडला आहे काय? आणि त्या आंदोलनानंतर अनुसुचित जातीच्या लोकांना मंदिर प्रवेश वर्जित नाही हे आता कायदेशीर झाले आहे. तरी पण एक अनुसूचित जातीचा नेता मंदिरात जातो आणि ते मंदिर धुवून काढले जाते. हे यापुढे आम्ही सुध्दा होवू देणार नाही असा एल्गार खा.राहुल गांधी यांनी केला. गुजरातच्या कॉंगे्रस संमेलनात खा.राहुल गांधी म्हणाले की, प्रेमाची जी व्याख्या मी भारत जोडो यात्रेत दाखवली त्यात माझ्याकडून ओबीसी समाज शिल्लक राहिला याचे मला दु:ख वाटते आणि तो समाज आता मी जोडून घेणार आहे.
आज डॉ.बी.आर.आंबेडकर सन्मान अभियान सुरू करणाऱ्या भाजपला याचा विसर पडला काय की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणुक लढविली तेंव्हा त्यांना हरविण्यासाठी कोणी-कोणी प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना संविधान सभेत कोणी जिंकून आणले. हे विसरुन चालणार नाही. पंडीत नेहरुंच्या एका वाक्याचा उपयोग करून भाजप पंडीत नेहरुंना डॉ.बाबासाहेबांचा विरोधक व्यक्ती म्हणून जाहीर करण्याचा प्रयत्न करते. त्याच पत्रामध्ये पंडीत जवाहरलाल नेहरुन यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना लिहिले आहे की, आपण राजीनामा दिलात तर मी लढाईत एकटा पडेल. या एका वाक्यामध्ये सुध्दा भरपूर मतीतार्थ लपलेले आहेत. आज बौध्दगयेमध्ये बौध्द धर्माची मंडळी आमच्या हातात या संस्थेचा कारभार द्यावा यासाठी आंदोलन करत आहे. परंतू दुर्देवाने ते तिर्थस्थान तथागत गौतम बुध्दांचे आहे आणि त्याचा कारभार पाहण्याचा हक्क सुध्दा बौध्द धर्मियांनाच आहे आणि आज त्यावर काम न करता भाजपला डॉ.बी.आर.आंबेडकर सन्मान अभिलयान आठवते काय? ही दुहेरी निती आहे. भाषणात आरक्षणावर आम्हाला आक्षेप नाही असे म्हणणारी भाजप जातीय जनगणणा का कत नाही. बिहारमध्ये नितीशकुमार भारतीय जनता पार्टीसोबत नसतांना जातीय जनगणणा झाली आहे. परंतू ती सर्वांना अद्याप मान्य नाही. आरक्षण सुध्दा पंडीत जवाहरलाल नेहरुंच्या काळात सुरू झालेले आहे. हे भारतीय जनता पार्टीने विसरायला नको. एकीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेत 136 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी पहिल्या क्रमांकावर आहे. पण त्याच वेळेस भाषण करतांना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते की, विरोधकांनी संविधानाच्या संदर्भाने केलेले निगेटीव्ही नॅरेटीव्ह आम्हाला घातक ठरले आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात सुध्दा कमी जागा मिळाल्या. याचा अर्थ खा.राहुल गांधी सांगतात ते सुध्दा खरे आहे. म्हणजे भाजपची मंडळी बोलत राहिल आणि त्याला कोणी विरोधच करू नये अशी असते का लोकशाही. म्हणुनच आता अमित शाह, जे.पी.नड्डा, बी.एल.संतोष यांना आपल्याच लोकांचे तोंड बंद करण्याची पाळी आली आहे. हा परिणाम खा.राहुल गांधी यांनी केलेल्या एल्गाराचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?