नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी परिसरात आज सकाळी एका फर्निचर गोदामाला आग लागली. त्यात अडकलेल्या 6 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. लाखो रुपयांचे नुकसान या आगीमुळे घडल्याचे सांगितले जात आहे.
आज सकाळी माळटेकडी परिसरातील फर्निचर गोदामाला आग लागली. आगीची माहिती मिळताच नांदेड महानगरपालिकेचे अग्नीशमन दल तेथे पोहचले. तेथे अडकलेल्या पाच ते सहा लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पण या आगीमुळे तेथे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्नीशमन दलाने काही क्षणातच या आगीवर नियंत्रण मिळवले.
फर्निचर दुकानाला आग ;लाखोंचे नुकसान; जिवीत हानी नाही

Leave a Reply