भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटने द्वारे देशाला स्वतंत्र, समता व बंधुता या तत्त्वांच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये समाजातील दुर्बल घटक व वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणाने व गांभीर्याने नमूद केलेली आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेस व्हावी व जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दि. ८ ते १४ एप्रिल दरम्यान राज्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ हा उपक्रम साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे.
त्यानुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रामध्ये ‘सामाजिक समता सप्ताहाचे’ उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून केले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.पी.विठ्ठल, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, मेघश्याम साळुंके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांच्यासह काळबा हनवते, डॉ. हर्षवर्धन दवणे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अनुपम सोनाळे, कार्याध्यक्ष प्रकाश तारू, सचिव सुरेश वाठोरे सह अनेकांची उपस्थिती होती.
Leave a Reply