नांदेड – एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, नांदेड या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. तरी पात्र स्थानिक महिला उमेदवारांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदासाठी 23 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी आर.पी. रंगारी यांनी केले आहे.
बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी, नांदेड या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद कार्यक्षेत्रातील स्थानिक रहीवासी असलेल्या उमेदवारांकडून अंगणवाडी सेविका, मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटीशर्ती याबाबत https://nanded.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी पात्र स्थानिक रहीवासी असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Leave a Reply