नांदेड सारख्या शहरातून एक विवाहित महिला सोशल मीडिया वर नांदेड च्या भाषेतून व्हिडिओ करायला सुरुवात करते .. सुरुवातीला अनेक जणांचे अपशब्द ऐकावे लागले असतील .. अशा गोष्टीला न जुमानता आपलं काम अविरत चालूच ठेवते.. एका विवाहित महिलेसाठी घरकाम करून व्हिडिओ बनवणं तेवढं सोप्पं नाही.. त्यासाठी घरच्या मंडळींची , नवऱ्याचं मानसिक पाठबळ असणं गरजेचं आहे.. त्यामुळेच आज या जोडीचं सगळीकडे कौतुक पाहायला मिळतंय.. आणि ही जोडी म्हणजे सोशल मीडिया वर धुमाकूळ घालणाऱ्या नांदेड च्या सौ.कल्पना खानसोळे (आत्याबाई)आणि आपल्या पत्नीला खंबीरपणे साथ देणारे अविनाश भाऊ खानसोळे … तुमचा संसार असाच सुखाचा राहो.. थोडे फार भांडण होवोत.. एवढं पण सुख काय कामाचं! असो हे विनोदाचा भाग झाला तसे तर तुम्ही दोघे ही समजूतदार आहात त्यामुळे भांडण होणारच नाहीत म्हणा ..तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..
Kalpana Khansole
Avinash Khansole
Leave a Reply