नांदेड,(प्रतिनिधी)-प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत सेवा दिल्याबरोबर उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना बदलीवर सोडण्यात आले आहे. आता उस्माननगरचे नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक झाले आहेत.
उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांची बदली जवळपास दीड वर्षांपूर्वीच झाली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लागल्या पण त्यांची बदली ही निवडणूक पार्श्वभूमीवर झालेली नाही, म्हणून त्यांना नांदेडमध्येच राखून ठेवण्यात आले. त्यावेळेस नियमित बदली झालेले पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांना मात्र बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले होते. आता चंद्रकांत पवार यांना आपल्या नवीन बदलीच्या ठिकाणी अर्थात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्यावर पोलीस ठाणे उस्माननगरची जबाबदारी देण्यात आली आहे.यापूर्वी काय झाले त्या सर्व बाबी सुयोग्य करून पोलीस ठाणे चालवण्याची कसरत महेश मुळीक यांना करावी लागणार आहे.
पण आजपर्यंत उस्माननगर ते वसंत नगर जाणारा रस्ता कसा साध्य करावा असा प्रश्न पोलीस विभागाला पडलेला आहे. काहीजण सांगतात शासकीय नोकरीमध्ये आजारी रजा असते या आजारी रजेचा फायदा घेऊन पुढे सुद्धा नांदेडमध्येच काम केले जाणार आहे. पण ते काम कोठे केले जाणार, कोण घेणार, कोणते काम करणार, या प्रश्नांची उत्तरे आज तरी प्राप्त झाली नाहीत. कोणा कोणाला थंड श्वास आले हा सुद्धा एक शोधाचा विषय आहे.
Leave a Reply