नांदेड – श्री राम जन्मोत्सवानिमित्त ६ एप्रिल रोजी काढण्यात येणारी शोभायात्रा श्री राममंदिर मंदिर रामघाट येथे प्रभु रामाच्या पालखीचे पुजन करून गाडीपुरा येथील हनुमान मंदिर येथे हनुमान चालीसा म्हटल्यानंतर श्री रेणुका माता मंदिर येथे पोहचणार आहे.त्यानंतर श्री रेणुका माता मंदिर येथे आरती करून प्रभु रामाच्या उत्सव मूर्तीचे संताच्या हस्ते अनावरण करून आरती केल्यानंतर शोभायात्रेची सुरवात होणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत शनिवारी देण्यात आली.
रविवार ६ एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. श्री राम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने काढण्यात येणारी शोभायात्रा शहर वासियांचे लक्ष वेधून घेत असते. त्यानुसार रविवारी शोभा यात्रेला सुरूवात होणार आहे. सदर शोभायात्रा श्री रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून निघाल्यानंतर ती जुना मोंढा टॉवर परिसर मार्गे गुरूद्वारा चौक, वजिराबाद, शिवाजीनगर, आयटीआय, वर्क शॉप कॉर्नर येथून अशोकनगरातील श्री राम मंदिरात पोहचणार आहे. या शोभायात्रेत विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात येणार आहेत. त्यासाठी श्री राम जन्मोत्सव समितीचे २२०० स्वयंसेवक देखरेख ठेवणार असून यामध्ये महिलांचा लक्षणीय समावेश राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत डॉ. रमेश नारलावार,मोहन पाटील, गणेशसिंह ठाकुर,संतोष (कालु) ओझा,उदयसिंह बिसेन,रविसिंह बिसेन,विरेंद्रसिंह परिहार,विजयसिंह गौर,रविसिंह ठाकुर,किशोरकुमार वागदरीकर,कैलाश यादव,संतोष देशमुख,तुलजेश कुरील, विनोदसिंह चौहान,नवीन लोध,भीमसिंह लोध,राहुलसिंह ठाकुर,नरेशसिंह ठाकुर, डॉ. राजेश्वर कदम, प्रेम जुनी, हनुमंत कोकुलवार, सत्यम ठाकुर, विशाल पटोले, जय आलमखाने, गजु ठाकुर, गणेश भावसार, अंगदसिंह परिहार, पापासिंह कौशिक, गजुसिंह वर्मा आदी उपस्थित होते.
Leave a Reply