नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील विद्यार्थिनी कु. पूजा काळे यांनी ऑल महाराष्ट्र वुशू असोशियन आणि नांदेड जिल्हा वुशू असोशियन तर्फे आयोजित ‘२२ वी राज्यस्तरीय सिनियर (महिला व पुरुष) वुशू अजिंक्यपद स्पर्धा-२०२५’ मध्ये सिल्वर मेडल पटकाविले आहे.
कु. पूजा काळे या गेल्या चार वर्षापासून मार्शल आर्ट चा सराव करीत आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्हास्तरीय मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविले होते. महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सांभाळून त्या मार्शल आर्ट चा सराव करत आहेत. आणि अनेक स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत.
विद्यापीठापासून जवळच असलेल्या धनगरवाडी या गावात ते राहतात तेथून ते रोज शिक्षणासाठी विद्यापीठामध्ये ये-जा करतात. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी आई-वडिलांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने त्या या यशापर्यंत पोहोचल्या आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी त्यांच्या या यशाबद्दल शाल व ग्रंथ भेट देऊन अभिनंदन केले. आणि इतर मुलींनीही पूजा काळे यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही यावेळी केले.
Leave a Reply