नांदेड, (प्रतिनिधी)-कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन वर्षापासून श्री.गोविंद गिरी देवजी महाराज, किशोरजी व्यास यांच्या कृपाआशिवार्दाने प्रभू श्री रामचंद्रांच्या श्री रामनवमीनिमित्त राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन दि.६ एप्रिल रोजी सकाळी साडेपाच वाजता कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
राम गितांची मंगलमय सुरमयी प्रभात हा राम गितांचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापासून सातत्याने होत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती, निवेदन प्रख्यात निवेदक अॅड.गजानन पिंपरखेडे यांची असून, निर्मिती सहाय्य पत्रकार विजय जोशी यांचे आहे. कलांगण प्रतिष्ठाण, श्रीराम भक्त मंडळ यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे. यावर्षी पुणे येथील प्रख्यात गायक संजीव मेहंदळे, प्रख्यात गायिका आरती दिक्षीत, प्रख्यात आसावरी जोशी-rबोधनकर, सुप्रसिध्द गायिका प्रणोती बिलोलीकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे. संगीत संयोजन छत्रपती संभाजीनगरचे राजेश देहाडे यांचे असून, तबला-ढोलक-ढोलकीवर सिध्दोधन कदम, तर अन्य संगीतसाथ बाबा खंडागळे, रोहित बन्सवाल व पवन तेहाले हे करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन वे.शा.स.खंडूगुरु जोशी आसोलेकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रम सुरु होतांना वैदिक मंत्रघोष वे.शा.स.मनोजगुरु पेठवडजकर व याज्ञवल्क्य वेदपाठ शाळेचे विद्यार्थी करणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामकथा व श्रीमद भागवत कथेचे निरुपणकार वे.शा.स.विश्वासशास्त्री घोडजकर यांना रामसेवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यास उद्योजक राजेंद्र हुरणे, डॉ.सुशिल राठी, रमेश मिरजकर, अनिल शेटकार, महावीर सेठीrया, पंकज लोखंडे हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. कुसूम सभागृहात ६ एप्रिल रोजी २०२५ रोजी सकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिवप्रसाद राठी, रमेश मेगदे, गोवर्धन बियाणी, शंतनू डोईफोडे, महेश चांडक, डॉ.सुरेश दागडीया, अॅड. चिरंजीलाल दागडीया, रमेश सारडा, निलेश चांडक, नंदकुमार दुधेवार, राम शेट्टी तुप्तेवार,रमाकांत गंदेवार, सुभाष बंग, हरिष मालपाणी, गजानन रेखावार, डॉ.श्याम राठी, विजय बंडेवार, प्रा.प्रभाकर उदगिरे, स.जगजीवनसिंघ रिसालदार, विजय डुमणे, रमेश सुरकुटवार यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी महिला समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात अरुणा राठी, सौ.राजश्री हुरणे, सौ.माधवी जोशी, डॉ.वैशाली गोस्वामी, सौ.वैभवी कुलकर्णी, डॉ.पद्मा राठी, सौ.मेघा जोशी सांगवीकर, सौ.प्राची चौधरी, सौ.प्राजक्ता वाकोडकर, सौ.अरुणाताई लाभशेटवार, सौ.वंदना हुरणे, सौ.रमाताई टिकोरे, सौ.माधवी पाठक, सौ.श्वेता बेताळे, सौ.मेधा धर्मापुरीकर, सौ.निता उंडेगावकर, सौ. जोशी नगारे, सौ.मंजू राठी, सौ.पुजा राठी, सौ.स्नेहा कुलकर्णी, सौ.निलिमा सरदेशपांडे, सौ.संध्या गाजरे, सौ.प्रतिभा पाटील, सौ.रागिनी जोशी, अॅड.उर्मिला हाटडे यांचा त्यात समावेश आहे. या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाचा नांदेडकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply