Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रा. राजू सोनसळे आमरण उपोषणाची यशस्वी सांगता.


 

महापालिका प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाहीची आंदोलकांना ग्वाही.

नांदेड : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील जागेचा विस्तार करावा आणि या परिसरात संशोधन केंद्र स्थापन करण्यात यावे , पुतळ्याला तातडीने सोनेरी रंग देण्यात यावा या व अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी आमरण उपोषणाचा एल्गार पुकारला होता त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने मागण्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

भारत देशातील सनातनी विचाराला गाडून अज्ञानाचा अंधकार दूर करून , ज्ञानाच्या ज्योती घरोघर पेटवणारे , भारतीय समता , स्वातंत्र्य , बंधुता आणि राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणे आवश्यक आहे . जागतिक नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामानवाच्या पुतळा परिसराचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने या परिसरात असलेली सर्व अतिक्रमण हटविण्यात यावीत . या परिसरातील खाजगी आणि शासकीय जागा महानगरपालिकेने ताब्यात घेऊन एक ऐतिहासिक स्मारक येथे उभा करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा रंग सोनेरी करण्यात यावा.याच परिसरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका , संशोधन केंद्र स्थापन करावे. ज्यामुळे नांदेडचे नाव जगाच्या इतिहासात नव्याने कोरले जाईल . या संशोधन केंद्रातून शेकडो संशोधक विद्यार्थी जगाच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी तयार होतील . या उदात्त हेतूने महानगरपालिकेने पुढाकार घेऊन तात्काळ भीम जयंती पूर्वी येथे संशोधन केंद्राची स्थापन करण्याचे अनुषंगाने सकारात्मक भूमिका घ्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे हे दिनांक 1 एप्रिल ते 3 एप्रिल कालावधीत महापालिका प्रशासनाचे मागण्याकडे लक्ष वेधण्याकरिता 48 तासांचे आमरण उपोषण केले होते. त्या आंदोलनाची यशस्वी सांगता झालेली आहे.


Post Views: 17






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?