प्रत्येक भाषा ही श्रीमंत असते. त्या श्रीमंतीला ओळखावी लागते आणि ती ओळख तुम्ही शब्दांचा वापर करतांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या अर्धविराम, पुर्णविराम, अनुस्वार, वेलांटी, ऊकार, यावर त्या भाषेची श्रीमंती जास्त उठून दिसते. लिहित असतांना बऱ्याचदा चुका होतात. त्या चुका कोण केल्या आहेत. त्यावर त्या लिहिणाऱ्याची महती कळते. लिहिणारा कोणी सर्वसामान्य माणुस असेल तर त्यावर चर्चा होत नाही. कोणी त्याला सांगतात की, तुझे चुकले आहे आणि तो दुरूस्त करतो. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लिहिण्यामध्ये चुक झाली असेल तर त्यावर कटाक्ष होणारच. 30 मार्च रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर येथील दिक्षा भुमिवर गेले असतांना त्यांनी तेथील आगंतुक बुकमध्ये लिहिलेल्या शब्दांवर आता हसणे येत आहे. यामध्ये बहुतांश चुका या अनुस्वाराच्या आहेत आणि हिंदी भाषेत तर अनुस्वाराचे महत्व सर्वात जास्त आहे. एकीकडे हिंदी भाषेबद्दल तुम्ही ज्या पध्दतीने बोलता त्याच पध्दतीने त्याचे लिखाण सुध्दा असायला हवे होते. नवीन शैक्षणिक धोरणानुसार दक्षीणेकडील राज्य हिंदीला विरोध करत आहे. नरेंद्र मोदी यांच्या या लिखाणाने दक्षीणेतील राज्यांना हे बोलण्याची संधी प्राप्त झाली आहे की, आगोदर आपले तर हिंदी सुधारा.
30 मार्च रोजी नरेंद्र मोदी नागपुर दौऱ्यावर आले होते. तेथे त्यांनी दिक्षाभुमीवर असलेला आगंतुक बुकमध्ये काही शब्द लिहिले आहेत. ज्यात बऱ्याच चुका झाल्या आहेत. सध्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला तीन भाषा आवश्यक आहेत. ज्यातील पहिली भाषा क्षेत्रीय भाषा किंवा मातृभाषा असेल. दुसरी भाषा हिंदी असेल. हिंदी भाषीक राज्यात दुसरी भाषा इंग्रजी असेल आणि गैर हिंदी भाषीक राज्यात हिंदी आणि इंग्रजी असेल. तिसरी भाषा संस्कृत आहे. ज्यावर जास्त जोर दिला जात आहे. परंतू दक्षीणेतील राज्यांनी अर्थात केरळ, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्य हिंदीच्या बळजबरीला विरोध करत आहेत. त्याचे प्रमुख तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन आहेत. मोदींनी दिक्षाभुमीसह राष्ट्र स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला सुध्दा भेट दिली. तेथील आगंतुक बुकात सुध्दा आपले विचार व्यक्त केले आहेत. पण ती प्रत उपलब्ध झाली नाही.
मोदींनी दिक्षा भुमीवर लिहिलेल्या विचारांची प्रत उपलब्ध झाली. त्यात पंचतीर्थों हा शब्द अनुस्वार लिहिलेला नाही. हूँ हा शब्द हुँ असा लिहिला आहे. समरसता या ऐवजी समसरता असे लिहिले आहे. सिध्दांतों या शब्दातील अनुस्वार लिहिलेला नाही. तसेच पंडीतों, वंचितों या शब्दातील अनुस्वार लिहिले नाहीत. श्रध्दांजली या शब्दात अर्ध्या ध ला द जोडलेले असते. परंतू नरेंद्र मोदींनी अर्ध्या व ला द जोडले आहे. हिंदी भाषेत बिंदी अर्थात अनुस्वार ला खुप महत्व आहे आणि बहुतांश चुका अनुस्वाराच्याच झालेल्या आहेत. सर्वसामान्यपणे यावर चर्चा झाली तर असे घडत राहते म्हटले जावू शकते. परंतू या चुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या आहेत. ही चुकांची सरबत्ती प्राप्त झाल्यानंतर कॉंग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी पंतप्रधानांनी आपल्या प्रॉक्सी रायटरला बरखास्त करण्यासाठी सुचवले आहे. आजच्या या प्रकारामुळे जी दक्षीणमधील राज्य हिंदीच्या विरोधात वादळ उठवित आहेत. त्यांना तर अगोदर तुमचे हिंदी सुधारा असे म्हणण्याची संधी प्राप्त झाली आहे.
Leave a Reply