गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आले. त्यांची ही भेट नियोजित होती. त्यांनी एका डोळ्याच्या दवाखान्याचे भुमिपुजन केले, दीक्षाभुमिला भेट देवून आपल्या श्रध्दा अर्पण केल्या आणि त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले. या सर्व कार्यक्रमांमध्ये संघप्रमुख मोहनजी भागवत त्यांच्यासोबतच होते. सार्वजनिक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी कॅमेरे अशीच भेट झाली. ही भेट ठरली होती. तेंव्हा अनेक चर्चा झाल्या, या विषयावर बोलणार, हा विषय सांगणार, या विषयातून मध्यस्थी मार्ग निघेल. परंतू कालच्या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही कारण स्वतंत्रपणे भेटच झाली नाही. गोदी मिडीया याचे खुप प्रचार करत आहे. परंतू गोदी मिडीयाला हे माहित नाही की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे बोलते ते कधी करत नसते आणि जे करायचे आहे ते कधीच बोलत नसते. संघ आपल्या निर्णयावर ठाम आहे. म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संघाच्या पसंदीचाच व्यक्ती भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाचा अध्यक्ष होईल.

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरला आले आणि संघ मुख्यालयात गेले. यापुर्वी नरेंद्र मोदी 2013 मध्ये संघ मुख्यालयात आले होते. त्यानंतर त्यांचे नाव पंतप्रधान पदावर निश्चित करण्यात आले आणि 2014 ची निवडणुक भाजपने जिंकली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदा संघ मुख्यालयात आले आहे. यावेळी त्यांची पंतप्रधान पदाची तिसरी वेळ आहे. या अगोदर अटल बिहारीजी वाजपेयी आपल्या पंतप्रधानाच्या तिसऱ्या कालखंडात नागपूरला आले होते. अर्थात सन 2002 साली आणि त्यानंतर अटलजींची रवानगी झाली आणि पुढची निवडणुक ते हारले. अटल बिहारीजी म्हणायचे मला संघातील नारायणरावजी तराटे यांच्याकडून प्रेरणा मिळते. नारायणरावजी तराटे यांनीच 1939 मध्ये अटल बिहारीजींना संघात आणले होते. 30 मार्च 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या कालखंडात संघ मुख्यालयात आले आहेत. मोदीजी एक पुस्तक लिहिल आहेत. त्या पुस्तकात त्यांनी मधुकरजी भागवत यांच्याकडून मला प्रेरणा मिळत असे लिहिलेले आहे. कोण आहेत मधुकरजी भागवत. सध्याचे संघप्रमुख मोहनजी भागवत यांचे वडील आहेत. मधुकरजी भागवत. आता अटल बिहारीजी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील दोन घटनांचा आम्ही सादर केलेला योगायोग आहे किंवा आता नरेंद्र मोदींचे सुध्दा अटल बिहारीजींसारखे घडणार आहे काय?

सार्वजनिक ठिकाणीच भेट झाली, बंद कक्षात भेटच झाली नाही. मग संघाची मंडळी भाजपचा अध्यक्ष कोण असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतरांसारखे 75 व्या वर्षी सेवानिवृत्ती घ्यावी या विषयांवर चर्चा कशी होणार. काही अंधभक्त सांगतात. मोदी अविनाशी आहेत. संघ ही भारतीय जनता पार्टीची मातृ संस्था आहे. पण राजकारणात ती कधीच ढवळाढवळ करत नाही. अशा पोस्ट अंधभक्त करत आहेत.पण सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक वक्तव्यात अनेक ठोसे मारलेले आहेत. ज्यामध्ये प्रत्येक मस्जिदीखाली खोदू नका, सर्वांना घेवून पुढे चाला हे शब्द म्हणजे आपल्या बिघडलेल्या मुलाला धडे होते, त्यांना अज्ञा होती. पण ते त्यांना काय हवे हे प्रत्यक्षात कोणाला कळू देत नसतात. संघ स्वत:ला सांस्कृतीक संघटन म्हणते आणि बीजेपी त्यांचा राजकीय पक्ष आहे हे सर्वांनाच माहित आहे. अध्यक्ष पदात काही अडचण नसली असती तर भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत अध्यक्ष कसा निवडला नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये त्या लायकीचा कोणी माणुस नाही काय? की, ज्याला अध्यक्ष करता येईल. या उशीरामुळे आता लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन सुध्दा होत आहे. भारतीय जनता पार्टी नामनिर्देशीत करते तेंव्हा त्यातील व्यक्ती महामंत्री संघटन या पदावर नियुक्त होतो. त्याला पुर्णत्व संघाच्या मान्यतेनंतरच मिळते. 75 वर्षाचा कायदा नाही. पण इतरांना 75 वर्षाच्या नावाखाली रिटायर करण्यात आले होते. त्यावेळी लालकृष्ण आडवाणी म्हणाले होते. ना मै टायर्ड हू ना मै रिटायर्ड हु । त्याही वेळेस कोणती गुप्त मिटिंग झालेली नव्हती.
एका राज्य सभा खासदाराने कालच्या भेटीनंतर एक पोस्ट केली आहे. की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचे स्वागत करून अटलजींसोबत केलेल्या अपमानाचे प्रायश्चीत केले आहे. पण कधी केला होता संघाने अटल बिहारीजींचा अपमान ? संघाने फक्त त्यांना घरी बसण्यास सांगितले होते. खरे तर मोदीजींनी संघाचा अपमान अनेकदा केलेला आहे. ज्यामध्ये जे.पी.नड्डाने आम्हाला संघाची गरज नाही असे सांगितले होते. खरे तर नड्डाची लायकीच नाही हे बोलण्याची. खरे तर संघ इतरांना प्रायश्चीत करायला लावतो. आज संघ वाईट परिस्थितीत आहे. आजच्या पुर्वी असा प्रसंग कधीच आला नाही. संघाच्यावतीने औरंगजेबच्या कबरीवर बोलण्याची ही वेळ नाही असे जाहीर केल्यानंतर कबरीवर बोलणारे गप्प बसलेले आहेत. अध्यक्ष कोण होईल याचा एक जुना संदर्भ वाचकांसाठी देत आहोत. भारताच्या प्रदेश मंत्री सुषमाजी स्वराज यांना सुध्दा भाजपचे अध्यक्ष व्हायचे होते. सध्या तामिळनाडुमधील डी.पुरंदरेशवरी यांचेही नाव पुढे येत आहे. सुषमाजी खरे तर देवीलाल यांच्या शिष्या आहेत. त्या समाजवादी विचारश्रेणीच्या व्यक्ती होत्या. पण नंतर त्या भारतीय जनता पार्टीत आल्या होत्या. त्यामुळे त्यांचा आणि डी पुरंदरेश्वरी यांचा संघाच्या शिकवणीत काही संबंध नाही. त्या शाळेतून त्या शिकल्याच नाहीत म्हणूनच त्यांना अध्यक्ष पद मिळणे अवघड होते. संघाच्या शाळेतून आलेला व्यक्ती अध्यक्ष होतो. आजच्या परिस्थितीत योगी आदित्यनाथ सुध्दा संघ सर्मपित आहेत. पण ते संघाचे विद्यार्थी नाहीत. म्हणून आजच्या परिस्थितीत संघ कोणताही भस्मासुर पाळण्याच्या तयारीत नाही. कारण कधी सुध्दा संघावर ईडीची रेड होवू शकते आणि मग मोहनजींचा राजीनामा घेतला जाईल आणि गुजरातचा कोणी माणुस संघ प्रमुख बनविला जाईल. ही भिती संघाला आहेच. आम्ही का आकलन करतो या गोष्टीचे तर भविष्याचा विचार करून करतोय. कारण जेंव्हा ताकत वाढते तेंव्हा तुमच्यातील उन्मतपणा वाढतो. हे खरेच आहे.
योगीने आज ईदच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये केलेला आतंक पाहा. तुमची नवरात्री, गणेशोत्सव, महाआरती, दुर्गाउत्सव, होळी, दिवाळी हे सर्व सण रस्त्यावर साजरे होतात मग एका दिवसाची रमजान ईद तुम्हाला सहन होत नाही. तामिळ भाषा आणि हिंदी भाषा यामध्ये सुरू असलेला वाद मोठा आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी संघ मुख्यालयाच्या आगंतुक पुस्तिकेत लिहिलेली हिंदी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलीन यांनी वाचली तर ते नक्कीच म्हणतील स्वत: अगोदर हिंदी शिका. भारतीय जनता पार्टी आणि संघामध्ये अरुणकुमार नावाचे एक समन्वयक आहेत. ते दिल्लीत राहतात. हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री असतांना सुपर सीएम या पदावर अरुणकुमारच होते. पुढे येणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष पदासाठी त्यांनीच मनोहर लाल खट्टर यांचे नाव पुढे आले आहे. पत्रकारांना बातम्या सुध्दा शासनाच्या मर्जीच्याच द्याव्या लागतात याचे उदाहरण म्हणजे तिहार तुरूंगातून परत आलेल्या एका पत्रकाराला दुरदर्शनमध्ये करोडो रुपयांचे पॅकेज देवून नोकरी लागणार होती. ती गुप्त बातमी एका महिला पत्रकाराने शोधून काढली आणि ब्रेक केली. दुरदर्शनमधील गुप्त माहिती बाहेर जाणे म्हणजे तो देशाच्या सुरक्षेला धोका आहे. म्हणून त्या महिला पत्रकाराविरुध्द पोलीस प्राथमिकी दाखल झाली आहे. खरे मांडले तर आम्ही देशद्रोही ठरू, आमच्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका होईल असा रंग देण्याचे काम सुरू आहे. काय करावे या परिस्थितीत वाचकांनो आपणच सांगा.
Leave a Reply