नांदेड(प्रतिनिधी)-आज 31 मार्च रोजी एक पोलीस उपअधिक्षक, एक श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, तीन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना त्यांना सेवानिवृत्तीचा निरोप देतांना सर्वांचे कुटूबांसह सन्मान केले.
बिलोली पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक शेख रफिक चॉंदसाब, शहर वाहतुक शाळेतील पोलीस उपनिरिक्षक संजय नामदेव केळकर, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भिमराव धोंडीबा रेणके (पोलीस ठाणे कुंडलवाडी), केशव जळबाजी पांचाळ (पोलीस ठाणे बारड), पंडीत रामजी राठोड(मुखेड), पोलीस अंमलदार विश्र्वनाथ तुकाराम रुंजे, विठ्ठल लक्ष्मण गजभारे(पोलीस मुख्यालय), रघुनाथ शंकर रेणके(विमानतळ), प्रकाश बदुसिंग राठोड(बारड), लालु शिवराम मदनुरवाले (धर्माबाद) असे दहा पोलीस आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सर्व सेवानिवृत्तांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि शाल भेट वस्तू देवून भविष्यात आनंदी जगण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमात पोलीस कल्याण विभागाचे नामदेव रिठ्ठे, वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्व्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरिक्षक माया भोसले यांनी केले. पोलीस कल्याण विभागातील पोलीस अंमलदार सविता भिमलवाड यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
Leave a Reply