काल-परवाच म्यानमार आणि बॅंकॉक येथे झालेल्या भुकंपाने त्या देशांनच नव्हे तर जगाला हादरुन टाकले आहे. आतापर्यंत एक हजार लोक मरण पावले आहेत. अनेक जण इमारतींखाली फसले आहेत, जीवंत आहेत. पण काढता येत नाहीत अशा परिस्थितीत आहे आणि ते स्वत: सुध्दा निघू शकत नाहीत. या भुकंपाचा ईतिहास 20 कोटी वर्षापुर्वीचा आहे. भारताने या भुकंपाला आपल्याला मिळालेली सुचना असेच घेण्याची गरज आहे. नाही तर भविष्यात भारताचे हिमालय हे नवीन होणाऱ्या भुकंपाचे केंद्र असेल.
बॅंकॉक आणि म्यानमार येथे झालेल्या 7.7 रिक्टरसेक्लसच्या भुकंपाने त्या देशांसह जगाला हादरुन टाकले आहे. आम्हाला वाचवा असा आरजव ते करत आहेत. त्या ठिकाणचे रस्त्यावरील, घरातील, हॉटेलमधील, विद्यापीठातील,विमानतळ येथील अनेक सीसीटीव्ही आता दिसायला लागले आहेत. त्यामध्ये दिसणारी परिस्थिती पाहिल्यानंतर एकदा वाचकांनी सुध्दा विचार करायला हवा. न जाणो आम्ही एखाद्या बहुमजल्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर आहोत आणि असा भुकंप झाला तर काय होईल.भुकंपाच्या संदर्भाने सर्वात जागरुक देश म्हणून जगात जापानचे नाव घेतले जाते. कितीही मोठा भुकंप झाला तरी तेथे मृत्यूचे प्रमाण नग्ण असते. तसेच नुकसान सुध्दा मोठे होत नाही. म्यानमार मध्ये तर जमीनीत अनेक जागी दऱ्या तयार झाल्या आहेत. तेथील विश्र्व विद्यापीठाचा पुर्णपणे सत्यानाश झाला आहे. दोन इमारती झोक्यासारख्या डुलतांना दिसत आहेत. काही निर्माणाधिन इमारती क्षणाधार्थ धाराशिाही झाल्या. म्हणजे निसर्ग जेंव्हा कोपतो तेंव्हा तो आपल्याला वेळ देत नाही. म्हणून आपली पुर्व तयारी महत्वपुर्ण आहे.
काही दिवसांपुर्वी दिल्लीमध्ये मोठा भुकंप झाला होता. त्यात लोक सांगत होते की, जमीन हादरण्यासोबत आम्हाला मोठा आवाज सुध्दा आला. हा आवाजमध्ये टेक्टॉनिक प्लेट हालत होत्या. कारण दिल्लीत सीसमिक झोन या सज्ञेत आहे. त्या टेक्टॉनिक प्लेट हालतात तेंव्हा त्या दोन प्लेटमध्ये असणाऱ्या मोकळीकतेमधून जो आवाज निघतो तो म्हणज ेभुकंपाची ऊर्जा आणि ती ऊर्जा जमीनीवर सत्यानाश करते. भारतात जेवढे पर्वत आहेत ते सर्व पर्वत अस्थिर आहेत. जगाच्या तुलनेत ते अजून युवाच आहेत.
20 कोटी वर्षापुर्वी जग एकच जमीन होती. त्याला पॅजिया असे नाव होते. त्यात युरेशिया आणि गोंडवाना असे दोन भाग होते. आज भारतात गडचिरोली जिल्ह्यात गोंड समाज राहतो म्हणून त्या जिल्ह्यात गोंडवाना नावाचे विद्यापीठ सुध्दा आहे. पॅजियाकडून गोंडवाना वेगळा झाला. या गोंडवानामध्ये भारत, आफ्रीका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सुध्दा होते. पॅजियाचे तुकडे भुकंपानंतर झाले आणि वेगवेगळे महाद्विप आणि देश तयार झाले. जे आज आम्ही पाहत आहोत. त्यात भारत आमचा एक देश आहे. भारत देश ज्या टेक्टॉनिक प्लेटसच्या खाली आहे. त्याा प्लॅट युरेशियाकडे अर्थात उत्तर दिशेला सरकत आहेत. आणि युरेशियाच्या टेक्टॉनिक प्लॅटवर दबाव वाढवत आहेत. त्यामुळे हिमायलयासह आमचे सर्व पर्वत संकुचित होत आहेत. त्यामुळे पर्वतांची उंची वाढत आहे. त्यामुळे त्यांची स्थिरता अस्थिरच आहे. भारतीय प्लेट दरवर्षी 5 सेंटीमिटरने युरेशियन प्लेटला दबाव वाढवत आहे. हिमालय पट्टा जेथे जमीनीखाली सतत हालचाली होत आहेत. यापुर्वी आलेल्या अनेक भुकंपामुळे 8 रिक्टर स्केलचा भुकंप सुध्दा आला होता. सन 1803 मध्ये सुध्दा असाच भुकंपप आला होता. त्या भुंपाने सुध्दा दिल्ली, मथुरा पर्यंत वावटळ उठवले होते. कुतूबमिनारचा गुबंद पडला होता. असे म्हणतात 100 ते 200 वर्षात असा मोठा भुकंप होतच असतो. आज भारताने म्यानमार आणि बॅंकॉक येथे झालेल्या भुकंपाने आम्हाला दिलेल्या सुचनेवर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पर्यावरणाविषयी चर्चा करणे आवश्यक आहे. नाही तरी आमच्याकडे फालतू विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे. परंतू ज्या खऱ्या विषयांवर चर्चा होणे गरजे आहे त्याबद्दल आम्ही गप्प आहोत. आम्ही या भुकंपाकडून काही शिकलो नाही आणि त्यावर काही उपाय योजना केली नाही तर भविष्यात भारताचा हिमायलय मोठ्या भुकंपाचा केंद्र बिंदु असेल असे तज्ञ सांगतात.
Leave a Reply