नांदेड(प्रतिनिधी)-ऊस तोड कामगाराच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आणि तिच्यासोबत अत्याचार करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला वसमत जिल्हा न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरी अशी कठोर शिक्षा ठोठावली आहे.
दि.11 मार्च 2022 रोजी हट्टा पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनुसार ते हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका झोपडीत आपल्या बालिकेसोबत झोपल्यानंतर दुसऱ्या ऊस तोड कामगाराचा मुला सागर रमेश इंगोले याने त्या अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात सुरूवातीला भारतीय दंड संहितेच्या कलम 363 प्रमाणे गुन्हा क्रमांक 79/2022 दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पठाण यांनी केला. हट्टा पोलीसांनी बालिकेला अहिल्यानगर येथून शोधून आणले. तपासादम्यान तिला पळवून नेणाऱ्या सागर रमेश इंगोलेने तिच्यावर अनेकदा अत्याचार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर या खटल्याचा तपास पुर्ण करून झाल्यानंतर तो सत्र खटला क्रमांक 9/2022 यानुसार वसमत न्यायालयात चाललात. त्यामध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 376, 366 आणि पोक्सा कायद्याची वाढ झाली.
वसमत येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संजय देशमुख (पिंपळगावकर) यांनी तपासलेले साक्षीदार, न्यायालयासमक्ष आलेला पुरावा या आधारावर वसमत जिल्हा न्यायाधीशांनी सागर इंगोले यास पोक्सो कायदा आणि विविध कलमानुसार 20 वर्ष सक्तमजुरी आणि 100 रुपये दंड अशी जबर शिक्षा ठोठावली. इतर कलमानुसार 2 वर्ष सक्तमजुरी आणि 100 रुपय रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा सागर इंगोलेला सोबत भोगायच्या आहेत. या खटल्यात हट्टा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार उत्तमराव वैद्य यांनी पैरवी अधिकारी ही भुमिका पुर्ण केली.
Leave a Reply