नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी, वजिराबाद येथे दि.16 मार्च रोजी सकाळी 11 ते 12 या एका तासात दोन लाख रुपये चोरणाऱ्या एका युवकाला वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडले आहे.
दि.16 मार्च रोजी अशोक नरहरी जाधव यांच्या घराचे कपाट फोडून कोणी तरी चोरटयाने घरातील कपाट फोडून 2 लाख रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 126/2025 दाखल होता. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, पोलीस उपनिरिक्षक विशिष्ट बिक्कट, पोलीस अंमलदार शिवसांब मठपती, साखरे, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार, पोकाले, ज्वालासिंग बावरी आदींनी दिलीपसिंघ कॉलनीमधील श्रीनिवास उर्फ अदु अनिल जाधव यास 28 मार्च रोजी ताब्यात घेतले. त्याने 2 लाख रुपये चोरी केल्याची कबुली सुध्दा दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक वशिष्ट बिक्कड करीत आहेत.
Leave a Reply