नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अवैध धंद्यांचे केंद्र गणेशनगर वाय पॉईंट आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही. काही दिवसांपुर्वीच त्या ठिकाणी एका युवकाचा खुन झाला होता. या ठिकाणी एक दारु अड्डा आहे तो कायदेशीर चालतो काय? त्या ठिकाणी अवैध पणे गॅस भरण्याचा धंदा नव्याने सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोबतच सावकारी कायद्याचा परवाना घेवून त्यात किती अवैध कारभार चालतात हा सुध्दा एक विषय मोठा आहे.
नांदेड शहरात अवैध धंद्यांचे केंद्र असा उल्लेख करायचा असेल तर तो उल्लेख गणेशनगर भागातील वाय पॉईंटला करावा लागेल. या ठिकाणी एक दारु अड्डयाची महती सुध्दा भरपूर मोठी आहे. आपल्या नावाचा अड्डा दुसऱ्याला देवून हा अड्डा चालविला जातो. दारु विक्रीसाठी सुध्दा अनेक नियमावली आहेत. त्या नियमावलीनुसारच हा अड्डा चालतो काय हा ही प्रश्न उपस्थित होत आहे. सकाळच्या सुर्योदय होण्याअगोदरच या दारु अड्ड्यातून जिल्ह्यात विविध ठिकाणी दारु पाठविली जाते असेही या भागातील नागरीक सांगतात. त्यावर कोणीच वचक आणला नाही. म्हणूनच हा सर्व व्यवहार चालत असतो.
याच ठिकाणी अवैध पणे वाहनात गॅस भरण्याचा धंदा सुरू झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. घरगुती गॅस वाहनांमध्ये भरून तो एक मोठा पैस कमविण्याचा मार्ग वायपॉईंवरच सुरू झाला आहे. सर्वांनाच कमी मेहनतीत जास्त पैसे हवे असतात. पण हे पैसे कमवतांना त्याचा समाजावर काय परिणाम होत असतो हे सुध्दा पाहण्याची गरज आहे. पैसे खुप आले म्हणजे माणुस सुखी होत नसतो. सिंघानीयाला त्याच्या दोन लेकरांनी करोडो, अब्जो रुपयांची संपत्ती आपल्या नावावर झाल्याबरोबर घराबाहेर काढल्याची घटना नवीनच आहे. अजुन त्यावरची चर्चा संपलेली नाही.
या ठिकाणी एका व्यक्तीकडे सावकारी कायद्याचे लायन्सस सुध्दा आहे असे सांगण्यात आले. परंतू सावकारी कायद्यात ज्या नियमावली प्रमाणे पैसे देणे, त्यावरील व्याज वसुल करणे या संदर्भाने या सावकारी व्यवसायात नियमितता आले काय याची तपासणी कोण करेल. ज्या ठिकाणी दारु विक्री होते, ज्या ठिकाणी दारु पिण्याची सोय असते. त्याच ठिकाणावरून वेगवेगळ्या अवैध धंद्यांची सुरुवात होत असते. हे सर्व व्यवसाय पोलीस माझ्या जवळचे आहेत याच दमावर चालविले जातात असेही या भागातील नागरीक सांगत असतात.
अवैध धंद्यांचे माहेर घर वाय पॉईंट??

Leave a Reply