नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील उर्दू शिक्षण देणारी सना वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी परवा दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर चर्चेत आली आहे. यामध्ये दहा जणांनी खोटे कागदपत्रे तयार केले, ते खोटे आहे हे माहित असताना त्यांचा वापर खरा असे दाखविले आणि फसवणूक केल्याचे आरोप या पोलीस प्राथमिकीमध्ये आहे.
मेराजुन्निसा बेगम मोहम्मद ऐहतेशामोद्दिन (63) या दिलेल्या तक्रारीनुसार त्या सना वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आहे. या अगोदरच त्यांनी एक अर्ज दिला आणि त्या अर्जासंदर्भाने 27 मार्च रोजी जबाब दिला. त्यानुसार सना संस्थेची नोंदणी क्र. के 2925 आहे. 1992 मध्ये हे सोसायटी मोहम्मद ऐहतेशामोद्दिन मोहम्मद वहिवोद्दिन यांनी सुरू केली होती. सन 2021 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर कार्यकारी मंडळाने मला सर्वानुमते अध्यक्ष पदावर निवडले. त्यानंतर मात्र पुढे सन 2024 मध्ये नवीन कार्यकारी मंडळाची निवड झाली आणि नियमावलीप्रमाणे तो फेरफार सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दाखल करण्यात आला. त्यामध्ये सना वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीनेय सना माध्यमिक व उच्च तथा सना इंटरनॅशनल स्कूल अशा संस्था चालविल्या जातात. तो फेरफार तात्पुरता स्वीकारण्यात आला. त्यानंतर इतर सदस्यांनी चुकीचा, बनावट स्वाक्षऱ्या करून तयार केलेला फेरफार अहवाल सादर केला. ज्यामध्ये मी दवाखान्यात ऍडमीट असतानाची तारीख आहे, तसेच दुसऱ्या एका सदस्याची ते विदेशात असतानाच्या तारखेत प्रोसेडींग बुक, सुचना रजिस्टर, सभेची उपस्थिती खोट्या पद्धतीने दाखविली आहे. ज्युनिअर कॉलेजमध्ये लाखो रूपये फीस वसूल केली जात आहे, हे सुद्धा चुकीची बाजू आहे. खोटे व बनावटी ठराव तयार करून संस्थेत गैरव्यवहार झाला आहे.
मेराजुन्निसा बेगम मोहम्मद ऐहतेशामोद्दिन यांनी तक्रारीत मोहम्मद मोसीखोद्दीन वहीदोद्दीन, शाहीन फातेमा अब्दुल समद, मोहम्मद शमशोद्दीन मोहम्मद बशीरोद्दीन, अहमद खान पठाण इब्राहीम खान पठाण, मोहम्मद अरोद्दीन अफनान अजीमोद्दीन, अजीमोद्दीन बशीरोद्दीन, मुजाहेदोद्दीन अजीमोद्दीन, सय्यद इमरान सय्यद अली पाशा, अब्दुल रहीम अब्दुल सलीम, मोहम्मद फेजोद्दीन मोहम्मद अजीमोद्दीन या दहा जणांची नावे आरोपी सदरात आहेत. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 468, 471, 472, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्र. 111/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास विमानतळचे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
Leave a Reply