नांदेड(प्रतिनिधी)- काल पासदगाव येथे शिक्षकाने केलेल्या आत्महत्येनंतर एका विधीसंघर्ष बालकासह चारपेक्षा जास्त लोकांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
प्रणव सुनील कारामुंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास त्यांचे वडील सुनील भानुदास कारामुंगे रा. भावसार चौक यांनी आपल्या घरी कोणते तरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यात त्यांनी मुलीला अश्लिल मॅसेज का केले, असे म्हणून त्यांना मारहाण केली व दहा लाख रूपयांची मागणी केली, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेचे कलम 108, 3 (5) नुसार प्रथमेश भुजंग टेंभुणवार, विद्या विजय टेंभुणवार, भुजंग मारोतराव टेंभुणवार, एक विधीसंघर्षग्रस्त बालक व इतर सर्व रा. दत्तनगर, नांदेड यांच्याविरूद्ध गुन्हा क्र. 126/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चवळी हे करीत आहेत.
शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी चारपेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल

Leave a Reply