नांदेड (प्रतिनिधी)- मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथे सापडलेली मुर्ती यासंदर्भाने आता वृत्त लिहीपर्यंत तरी शासकीय स्तरावरून काही सांगण्यात आलेले नाही. पण ही मुर्ती सोन्याची आहे, असे सांगितले जात आहे. या मुर्तीमध्ये चंद्रपूरच्या देवीची छवी दिसते असे लोक सांगतात. चिकाळा तांडा येथे या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे.
28 माचर्र् रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास चिकाळा तांडा ते हाजापूर रस्त्यादरम्यान गायरान शिवारातून लक्ष्मण डुबूकवाड हे येत असताना त्यांच्यासमोर वीज चमकली, असे सांगण्यात आले. त्यानंतर हिरवा लुगडा परिधान केलेली एक महिला त्यांना दिसली आणि त्यानंतर ते बेशुद्ध झाले. काही वेळानंतर ते रडतच चिकाळा तांडा येथे गेले आणि घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. त्यांना गावकरी त्यांच्यासोबत तेथे गेले तेव्हा तेथे साडेतीन किलो वजनाची सोन्याची मुर्ती सापडली असे सांगतात. गावकऱ्यांनी अनेक लोकांना बोलाविले त्यामुळे तेथे गर्दी झाली आणि हळूहळू ही वार्ता दुरवर पसरली आणि बऱ्याच दूरवरून लोक या मुर्तीच्या दर्शनासाठी येत आहेत. मुर्तीसमोर दिसणारे पैसे पाहून असे म्हणता येईल की तेथे आता दुकान थाटण्यात आले आहे.
खरे तर ही माहिती मिळाल्यानंतर शासन स्तरावर, पुरातत्व विभागाच्यावतीने या मुर्तीची तपासणी होणे आवश्यक आहे. ज्यामध्ये ही मुर्ती कधीची आहे हे निश्चित होईल, सोन्याची आहे की, नाही हे निश्चित होईल आणि त्या अनुषंगाने मुर्तीबाबत माहिती समजेल. परंतु आता 36 तासांनंतर सुद्धा शासनाडकडून काहीच सांगण्यात आले नाही. मुर्तीजवळ मात्र गर्दी दिसत आहे.
Leave a Reply