नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील ज्या ठिकाणी वीट भट्टी वर काम करणारे वंचित गरोदर माता व बालकाचे लसीकरण करणे, राष्ट्रीय कुष्ठरोग व क्षयरोग आरोग्य विषयक समुपदेशन करणे, वैयक्तिक स्वछता, आरोग्य तपासणी वीट भट्टी कामगार आहेत यांच्या कुटुंबातील स्थलांतरित कुटुंबाना आरोग्य सेवा उपलब्ध करून त्यांना आरोग्य सेवा देण्यात यावी असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी दि. 29 मार्च 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव अंतर्गत वाजेगाव कार्यक्षेत्रातील विट भट्टीच्या पाला वर अचानक भेट देऊन निर्देश दिले व त्या ठिकाणी राहत असलेल्या कुटुंबातील गरोदर माता यांची पालावर जाऊन गृहभेट दिली व त्या ठिकाणी राष्ट्रीय माता बालसंगोपन कार्यक्रम अंतर्गत मातेला आरोग्य विभाग मार्फत कोण कोणत्या सेवा दिल्या जातात याची प्रत्यक्ष गरोदर माता लाभार्थी यांच्या सोबत संवाद साधुन आस्थेवाईकपणे विचारणा केली. आरोग्य विभाग मार्फत गरोदर मातांना मोफत आरोग्य सेवा दिली जाते या सेवेचा लाभार्थींनी लाभ घ्यावा व प्रसृती सुरक्षित शासकीय दवाखान्यात करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी केले.
नांदेड जिल्ह्यात वीटभट्टी तालुक्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रा मध्ये वीटभट्टी आहेत. त्या ठिकाणी काम करणारे कामगार यांना शुध्द पाणी पुरवठा होण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या पाणी स्तोत्राची पाणी नमुने तपासणी करण्यात यावी. राष्ट्रीय माता बालसंगोपन कार्यक्रम मधील संपुर्ण आरोग्य सेवा त्या कारखाना ठिकाणी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करून आरोग्य सेवा देण्यात यावे. या मध्ये गरोदर मातेला विशेष सेवा या मध्ये संपुर्ण मोफत रक्त तपासणी, लघवी तपासणी, सोनोग्राफी व संदर्भ सेवा देण्यात यावे असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी नांदेड तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमजद, आरोग्य सहाय्यीका, आरोग्य सेविका,आशा यांना निर्देशित केले. यावेळी आरोग्य उपकेंद्र येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
Leave a Reply