नांदेड (प्रतिनिधी)- एका चालत्या ट्रकच्या पाठीमागून चढून अज्ञात चोरट्यांनी त्यातून 9 क्विंटल 10 किलो सुपारी, 5 लाख रूपयांची चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मोहम्मद रफिक मोहम्मद इलियास मुसा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते नेहरूनगर जि. उत्तर कनडा रा. कर्नाटक येथील आहे. 28 मार्च रोजी पहाटे 4.30 वाजता ते आपला ट्रक क्र. के.ए. 20 बी 6880 घेऊन नागपूरकडे जात असताना बोंढार वळण रस्त्यावर काम सुरू असल्याने तेथे वाहनाचा वेग कमी करावा लागला. याचदरम्यान कोणीतरी चोरट्यांनी त्यांच्या ट्रकमध्ये चढून 9 क्विंटल 10 किलो सुपारी चोरून नेली आहे. या सुपारीची किंमत 5 लाख रूपये आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 307/2025 दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मठवाड करीत आहेत.
Leave a Reply