नांदेड(प्रतिनिधी)-सन 2010 मध्ये बीड जिल्हा कारागृहातून परभणी जिल्हा कारागृहात आणत असतांना एक आरोपी पळून गेला होता. स्थानिक गुन्हाशाखेच्या पथकाने या पळून गेलेल्या आरोपीला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार 15 एप्रिल 2010 रोजी पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी उर्फ राहुल बादल बंजारा हा बीड कारागृहातून परभणी कारागृहात आणत असतांना परभणीतून बीड पोलीसांच्या हातावर तुरी देवून पळून गेला होता. त्यासंदर्भाने पोलीस येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 73/2010 दाखल होता. हा सध्या राजस्थानमध्ये राहतो. पण 27 मार्च रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक बळीराम दासरे, पोलीस उपनिरिक्षक हरजिंदरसिंघ चावला, पोलीस अंमलदार विठ्ठल वैद्य, मिलिंद नरबाग, राजू डोंगरे यांना कामगिरीवर पाठविले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी यास पकडले. पुढील तपासासाठी पंडीतसिंग जुन्नीला कोतवाली पोलीस ठाणे परभणी यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
15 वर्षापुर्वी पोलीसांच्या ताब्यातून पळून गेलेला गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने पकडला

Leave a Reply