Advertisement

मोहनजी भागवत यांचे ऐकले नाही आपली खुर्ची जाणार हे नरेंद्र मोदींना माहित आहे


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळले आहे की, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जमवून घेतले नाही तर पुढे आपली खुर्ची सुद्धा धोक्यात येणार आहे. सत्तेच्या 11 वर्षांत पहिल्यांदा नागपूरच्या स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात त्यांना जाण्याची आठवण झाली यासाठीचा विलक्षण शब्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वापरला आहे. त्यांनी सत्ता तुमची आणि दिशा आमची हा वाकप्रचार जनसंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत चालवला आहे. कोणती आहे ती विलक्षण घोषणा ती म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदावर संजय जोशी यांचे नाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काय घडते याची जाणीव नरेंद्र मोदींना सुद्धा आहे. कारण ते सुद्धा याच शाळेतले विद्यार्थी आहेत. पण पंतप्रधान झाल्यावर त्यांना या शाळेचा विसर पडला होता आणि आज जी आठवण झाली आहे, ती आठवण शाळेनेच करून दिली आहे. काय घडणार आणि 30 तारखेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संजय जोशी यांचे नाव पुढे आणले असले तरी त्यात देणे आणि घेणे असा व्यवहार होईल आणि त्या व्यवहारात अध्यक्षपदासाठीचे नाव वेगळेच ठरेल. परंतु संजय जोशी यांची नियुक्ती संघटन महामंत्री या पदावर करून घेण्याचा हा खेळ असेल, असे आम्हाला वाटते.
अटल बिहारी वाजपेयी आणि त्यावेळी संघाचे प्रमुख असलेले बाळासाहेबजी देवरस या दोघांना जाणनारे पत्रकार अभिज्ञान प्रकाश आणि 4 पीएम या संकेतस्थळाचे संपादक संजय शर्मा यांच्यात झालेल्या चर्चेनुसार अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान आणि बाळासाहेबजी देवरस हे संघप्रमुख असताना भारतीय जनता पार्टी आणि संघ यांच्यात संघर्ष चालतच आला होता. अटल बिहारी वाजपेयी सांगायचे की, तात्विक विचार ठेवून चालणारी संघटना पुढे राजकीय पक्षात बदलते. परंतु आरएसएसने आपली जागा बदलली नाही. जुन्या काळात अटल बिहारी वाजपेयी युवा अवस्थेत असताना पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी तत्कालीन संघप्रमुख गोळवलकर गुरूजी यांच्यात झालेल्या चर्चेनंतरच जनसंघ स्थापन झाला होता आणि राज्य तुमचे आणि निती आमची हे त्यावेळेच ठरले होते. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा सांगत होते की, राजकीय पक्षापेक्षा मोठा फायदा तात्विक संघटनेचा होत असतो. म्हणूनच आरएसएस वेगळी राहिली. खरे राजकारण तर आरएसएसच करते, सध्याचे संघप्रमुख मोहनजी भागवत यांनी अत्यंत विलक्षणपणे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदासाठी संजय जोशी यांचे नाव पुढे आणून गुजरात लॉबीला हलवून टाकले. हा बारगेनिंग गेम असेेल, घेण्या-देण्याचा विषय असेल. 2013 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचा चेहरा हा पंतप्रधान पदासाठी आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच ठरवले होते. पण त्यानंतर नरेंद्र मोदी यांना संघाची आठवण कधीच आली नाही, एक अपवाद आहे आणि तो म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुर्तीच्या प्रतिष्ठापणेत संघप्रमुख मोहनजी भागवत यांना बोलाविण्यात आले होते. याशिवाय मात्र संघप्रमुखांचा सन्मान भारतीय जनता पार्टीने केलेला कोठे दिसला नाही.
नरेंद्र मोदी सुद्धा त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत, ते संघप्रचारक होते, त्यामुळे ते थे काय घडते याची जाणिव त्यांना सुद्धा आहे, चैत्र शुद्ध वर्षप्रतिपदेच्या शके 1946 अर्थात 30 मार्च 2025 रोजी नागपूरच्या संघ मुख्यालयात होणारी बैठक महत्वाची आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी काय सरप्राईज हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. 18 वर्षांपासून अडगडीत पडलेल्या संजय जोशी यांचे नाव पुढे आणून संघाने आजपर्यंत केले तेच काम पुढे चालविले आहे. भारतीय जनता पार्टीला सुद्धा हा विचार कधीच विसरायला नको की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीशिवाय भारतीय जनता पार्टी उभी राहू शकत नाही. संघाची आम्हाला गरज नाही, असे वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी केले होते. खरे तर त्यांच्यात हे बोलण्याची हिम्मत कशी आली हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. परंतु आपल्या आसपास तयार झालेली परिस्थिती आपल्याला बोलायला लावते असेच काही तरी जे.पी. नड्डा यांचे झाले असणार. त्यानंतर मात्र संघाने सुद्धा आम्ही निरीक्षण करतो, अवलोकन करत असतो आणि कायम करत राहणार हे दाखवून देत भारतीय जनता पार्टीला 240 ची संख्या प्राप्त झाली. ही संख्या सुद्धा वादग्रस्त आहे, तो वेगळा विषय. संघाच्या कोठेही नोंदणी फॉर्म नसतो म्हणजे ते व्यक्तीच्या मनात नोंदविले जाते आणि तो संघ कार्यकर्ता होत असतो. नोंदणी फॉर्म तर बीजेपीचे भरले जातात, परंतु संघाच्या सुद्धा 32 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटना आहेत. 240 ही संख्या आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हरियाणा, महाराष्ट्र जिंकून दाखविले आणि आता ते बार्गेनिंग गेम खेळत आहेत. त्यांचे पण काय चुकले.
भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदावर संजय जोशी यांच्या नावाची आज चर्चा होत असली तरी त्यात मधला मार्ग निघेल असे वाटते. परंतु अध्यक्षपदावर येणारा माणुस हा गुजराती लॉबीच्या प्रभावातला नसणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे. परंतु यापेक्षा एक मोठे पद आहे, ते म्हणजे संघटन महामंत्री. अध्यक्षपदाच्या नावावर काही दुसरेच नाव सुनिश्चित झाले तर संजय जोशी यांचे नाव संघटन महामंत्री पदावर होईल, हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खेळी आहे. 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांनी मार्गदर्शक मंडळात काम करावे असा नियम नरेंद्र मोदी यांनीच आणला. आज नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ हे सुद्धा हिंदु-मुस्लिम या कट्टरवादावर बोलत आहेत. वाचकांसाठी एक जुने उदाहरण देऊ इच्छितो, सन 2009 मध्ये अशीच कट्टरवादीची भुमिका घेऊन लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. त्यावेळी मोठा प्रश्न असा तयार झाला की, हिंदु आक्रमक भुमिका घेऊन नेत्यांना चालायचे असेल तर ते फक्त 20 टक्के लोकांचे नेते आहेत आणि म्हणूनच तत्कालीन संघप्रमुख बाळासाहेबजी देवरस यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना समोर आणले कारण त्यांच्यामध्ये अटल बिहारी या नावासह अनेक दुसरे मुद्दे त्यांची बाजू भक्कम करणार होते. पण 2009 च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस 200 च्या पार झाली होती. आणि त्यानंतर 34-35 टक्के मतदान हवे या विषयावर संघ आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्रितपणे एम.एल. श्रीनिवास यांच्या पुस्तकातून धडा घेतला आणि कट्टर हिंदु या शब्दावर भारतात सरकार आणणे अवघड आहे यावर काम केले आणि सन 2014 ला सरकार आले. आजचे संघप्रमुख मोहनजी भागवत सुद्धा सांगतात प्रत्येक मस्जिदीखाली शिवलिंग शोधणे बरोबर नाही. अर्थातच त्यांना सुद्धा कट्टर हिंदु हा शब्द सरकार चालावायचे नाही. हा एक विचार आणि वाचकांसाठी मांडला आहे. याशिवाय तर केंद्र सरकारपुढे असलेले अनेक प्रश्न आहेत. ज्यामध्ये भारतासमोर उभी असलेली मंदीची लाठ, भारताचा कमी झालेला निर्यात, वाढलेली आयात, केंद्र सरकारवर बोजा असलेले लाखो-कोटींचे कर्ज हा विचार तर वेगळाच आहे.


Post Views: 137






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?