नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून चोरीच्या घटनेतील सोन्याचे व चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 38 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस उपनिरिक्षक बळीराम दासरे, पोलीस अंमलदार तिरुपती तेलंग, बालाजी यादगिरवाड, सिध्दार्थ सोनसळे, राजेंद्र सिटीकर आणि दिपक ओढणे यांना राष्ट्रीय हिंदी गांधी विद्यालय हिंगोली गेट येथे पाठविले. पोलीस निरिक्षकांच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तेथे उमेश सर्जेराव चव्हाण (26) रा.धानोरा ता.कळमनुरी जि.हिंगोली यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलीस ठाणे कंधार, पोलीस ठाणे उमरी येथील दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये चोरी केलेल्या सोने-चांदीच्या दागिण्यापैकी 1 लाख 38 हजार 506 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेला आरोपी उमेश चव्हाण हा नायगाव येथील दोन वेगवेगळ्या चोरी प्रकरणात फरार होता. हे गुन्हे 2019 व्या वर्षातील आहेत. सध्या उमेश चव्हाणचा ताबा पुढील तपासासाठी कंधार पोलीसांकडे देण्यात आला आहे.
Leave a Reply