नांदेड(प्रतिनिधी)-दिलीपसिंघ कॉलनी गोवर्धनघाट येथे एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार 16 मार्च ते 23 मार्च दरम्यान घडला आहे.
गोवर्धनघाट येथे राहणारे अशोक नरहरी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 मार्चच्या सकाळी 11 वाजेपासून ते 23 मार्चच्या दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांच्या घरात कोणी नव्हते. याचा फायदा घेवून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी लॉकरचा पत्रा वाकवून त्यातील 2 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 126/2025 दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक बिकड यांच्याकडे देण्यात आला आहे.
Leave a Reply