Advertisement

शहिद दिनानिमित्त 72 रक्तदात्यांनी केले रक्तदान – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-आज शहिदे आझम भगतसिंघ, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीपित्यार्थ साजरा होणाऱ्या शहिद दिवसानिमित्त महाराणा प्रताप चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 72 जणांनी रक्तदान केले आहे.
भगतसिंघ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरदार प्रितपालसिंघ शाहु यांंनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराणा प्रताप चौकात या रक्तदान शिबिरााचे उद्‌घाटन माजी सैनिक अरुण खांडरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माजी आ.अमरनाथ राजूरकर, मिलिंद देशमुख, विजय येवनकर, संतोष भोसले यांची उपस्थिती होती. आज या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला आणि 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हुजूर साहिब ब्लड बॅंकेने रक्त संकलनाची जबाबदारी सांभाळली होती.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी फाऊंडेशनचे कार्यकर्ते मल्लीकार्जुन चाकोते, सोनु खालसा, जीवन शिंदे, सुमित गादेकर, करण शाहु, अजय हनमंते, पवन वाघमारे, रुपेश भुजबळे, विशाल सोळंके, योगेश मगरे, स्वप्नील गुंजकर, वसंत राठोड, बबलु लांडगे, यशोदिप गोडबोले, तथागत ढेपे, शिवा मुनेश्र्वर, बादलसिंघ धारीवार यांनी परिश्रम घेतले. या शिबिरास भेट देणार पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, समाजसेवक बब्बु भाई,सचिंदरसिंघ शाहु, छोट्या बालिका सरवरी आणि आसावरी यांनीही भेट दिली. या शिबिरास विशेष सहाय्य करणारे सरदार गुरदयालसिंघ सपुरे हे आहेत. या कार्यक्रमाची प्रस्तावना सरदार प्रितपालसिंघ शाहु यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन राजेश तलवारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.


Post Views: 3






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?