Advertisement

न्यायव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न – VastavNEWSLive.com


उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर 50 कोटी रुपये रोख सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर आणखी एक मोठा खुलासा झाला. त्यांचे नाव 98 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात आरोपी क्रमांक 10 म्हणून नोंदले गेले आहे. न्यायमूर्ती पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीवर असे गंभीर आरोप होणे हे आपल्या न्यायव्यवस्थेसाठी चिंतेची बाब ठरते. त्यामुळे प्रश्न असा आहे की, अशा लोकांनी न्यायमूर्ती पदावर राहण्यास सक्षम आहेत  का?

 

विरोधकांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी यावर आपली तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी स्पष्टपणे विचारले की, जर न्यायमूर्तीवरच असे  गंभीर आरोप होत असतील, तर लोकशाहीचे भवितव्य काय? न्यायसंस्थेची पारदर्शकता आणि शुद्धता टिकवण्यासाठी काय केले जात आहे, याची त्यांनी विचारणा केली.

घटनाक्रम आणि आढळलेली रोख रक्कम

14 मार्च रोजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात आग लागली. त्या वेळी ते घरी नव्हते, मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर, घरात तब्बल 50 कोटी रुपये रोख सापडले. ही माहिती 21 मार्चला सार्वजनिक झाली आणि माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली.

कर्ज गैरव्यवहार आणि आरोप पद

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा भूतकाळही वादग्रस्त राहिला आहे. 2014 मध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाल्यानंतर, ते शिंगवली शुगर मिलच्या एका 98 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी होते.

शिंगवली शुगर मिलने बँकेकडून घेतलेले हे कर्ज थेट शेतकऱ्यांना न देता, वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले होते. त्यामुळे ओरिएंटल कॉमर्स बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रार नोंदवली आणि एकूण दहा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यशवंत वर्मा त्यापैकी एक होते.

न्यायमूर्ती पदावर कायम राहण्याचे कारण?

गुन्हा दाखल होऊनही यशवंत वर्मा न्यायमूर्ती पदावर कायम राहिले. हे आश्चर्यकारक आहे की, अशा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांच्या घरात सापडलेल्या 50 कोटींच्या रकमेचा स्रोत काय? न्यायसंस्था आणि संबंधित अधिकारी या प्रकरणावर मौन का बाळगत आहेत?

पत्रकारिता आणि समाजाचा प्रतिसाद

पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. या प्रकरणात माध्यमे, जनता आणि जबाबदार संस्था यांनी प्रश्न विचारणे अत्यावश्यक आहे.

2018 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (ब) आणि 409 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. ज्या मध्ये 98 कोटीचे कर्ज आहे, या पार्श्वभूमीवर, भारतीय न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?