Advertisement

अनुसूचित जमातीचे प्रश्न लवकरच निकाली काढणार – उपायुक्त धर्मपाल मेश्राम

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची रात्री उशिरा नांदेड येथे शिष्टमंडळाची भेट घेवून चर्चा केली

नांदेड:-अनुसूचित जाती-जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी नांदेड येथे शुक्रवारला रात्री उशिरा शासकीय विश्रामगृहात शिष्टमंडळाची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष तायवाडे व त्यांचे सहकारी यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांच्या समस्या समक्ष जाणून घेतल्या.

यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमातीच्या सरळ सेवेतील रखडलेली 12 हजार 500 पदांची आदिवासी बांधवाची भरती तात्काळ सुरु करावी. हा महत्वाचा प्रश्न शिष्टमंडळाने त्यांच्यापुढे मांडला.

या प्रश्नावर लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती-जमातीच्या आयोगाच्या कार्यालयात आदिवासी विभागाचे सचिव, आयुक्त, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधीसोबत संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. तसेच टीआरटीआयचा आढावा काढला आहे. त्यांची सुध्दा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवाना योग्य न्याय मिळेल यासाठी आयोगाच्यावतीने प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

तसेच नांदेड शहर व जिल्ह्यात आदिवासी बांधवाची संख्या मोठया प्रमाणात आहे. परंतु याठिकाणी क्रांतीनायक बिरसामुंडा यांचा पुतळा उभारण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत नांदेड शहर व जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी क्रांतीनायक बिरसामुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत त्याना निर्देश देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?