Advertisement

 बौद्धीक अक्षम मुलांच्या आरोग्य शिबीरात देशातील तज्ञ डॉक्टरांचा उपचार


मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रमाचे जिल्हयाधिकाऱ्यांकडून कौतुक 

नांदेड:- नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला असून सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाले आहे.अशावेळी सातत्यपूर्ण 15 वर्ष मेंदूचे विकार असलेल्या बौद्धीक अक्षम मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार 20 मार्च रोजी प्रारंभ झाला. पुढील दोन दिवस हे शिबीर चालणार आहे.

आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड व विविध मान्यवरांनी आरोग्य शिबिरास भेट देवून माहिती घेतली. यावेळी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, डॉ. सुरेश दागडीया, अंकित अग्रवाल, कुणाल मालपाणी, गोवर्धन बियाणी, द्वारकादास साबू, नारायण कलंत्री, रयत रुग्णालयाचे कोषाध्यक्ष सुधिर चिंतावार, नेरली कुष्ठधामचे सहसचिव एम. आर. जाधव व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांची उपस्थिती होती.

आरोग्य शिबिराच्या माध्यमातून राजस्थानी शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहे. यापुढेही आरोग्य शिबिराची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी होऊन अधिकाधिक रुग्णांना याचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले यांनी दिली.

दोन दिवसात जवळपास 500 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली  मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नियोजनात आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व रामप्रताप मालपाणी मुक बधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांना लाभ होत आहे. हे आरोग्य शिबीर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य तर त्यांच्या पालकात समाधान व्यक्त करणारे ठरले आहे.

टीम डॉ. अनैता हेगडेंचे कार्य प्रशंसनीय – डॉ. सचिन खल्लाळ

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अनैता हेगडे, डॉ.अवि शहा व डॉ.आशा चिटणीससह 35 डॉक्टरांची टीम सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत रुग्णांवर मोफत तपासणी व  उपचार करीत आहे.समाजाचे देणे लागतो याभावनेतून केलेले हे कार्य प्रशसनीय असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा मुलांसोबत वाढदिवस 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज या शिबिराला भेट दिली.या ठिकाणी उपस्थित पालक,मुले यांच्याशी चर्चा केली. देशातील तज्ञ डॉक्टर आज या ठिकाणी त्यांच्या तपासणीला आले होते. अशा मुलांसाठी आपण जिल्हास्तरावर काय करू शकतो, या संदर्भातही त्यांनी यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची चर्चा केली. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवरांची देखील त्यांनी चर्चा केली. आपल्या वाढदिवसाला या मुलांसोबत काही वेळ घालवता आला याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?