नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयातर्फे सुरू असलेल्या वार्षिक तपासणी अहवालातील कवायतीसाठी (परेड) करतांना आज सकाळी एका पोलीस अंमलदाराच्या डाव्या हाताला माकडाने चावा घेतला. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयातील विशेष दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
नांदेड जिल्हा पोलीस दलाची तपासणी सुरू आहे. तपासणी दरम्यान सर्वात शेवटी कवायत आणि नोटस लिहिले जातात. कवायत चांगली व्हावी म्हणून त्यासाठी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार हे बरेच दिवस सराव करतात. आज 21 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजेच्यासुमारास पोलीस मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राऊंडवर सराव सुरू होता. या दरम्यान अचानकच एका माकडाने ग्राऊंडमध्ये उडी घेतली आणि सराव करणारे पोलीस अंमलदार माधव भगवान पवार बकल नंबर 2992 यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. माकडाने घेतलेला चावा मोठाच होता. जवळपास 3 ते 4 इंचाची जखम झाली आहे. त्वरीत राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांनी जखमी झालेल्या माधव पवार यांना उपचारासाठी विष्णुपूरी येथे पाठविले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या विशेष दक्षता विभागातील कक्ष क्रमांक 15 मध्ये उपचार सुरू आहे. त्यांची देखरेख करण्यासाठी पोलीस शिपाई बालाजी सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी दवाखान्यात भेट देवून जखमी झालेल्या पोलीस अंमलदाराची विचारपुस केली आहे.
परेड सराव करणाऱ्या पोलीस अंमलदारावर माकडाचा हल्ला

Leave a Reply