नांदेड (प्रतिनिधी)-रोजगार मेळाव्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने कंपन्यांना मुलाखत द्यावी आणि यशस्वी जीवनाची वाटचाल सुरू करावी, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. या मेळाव्यास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही भेट देवून उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात केले होते. यावेळी माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, डॉ. हनमंत कंधारकर, सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, अरविंद कंग्रालकर, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. डी. एम. खंदारे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील अब्दुल करीम यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोजगार मेळावा आयोजन करण्याची विद्यापीठाची ही पहिलीच वेळ असून येथून पुढे वर्षातून दोन वेळा नियमितपणे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक कंपनीसोबत सामजंस्य करार करण्यात येईल अशी माहिती कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी दिली. या मेळाव्यास 3 हजार 200 ऑनलाईन विद्यार्थ्यांनी तर मेळाव्याच्या ठिकाणी 1 हजार 200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, असे एकूण जवळपास 4 हजार 400 विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी जवळपास 50 कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखत घेण्यासाठी आले होते. या रोजगार मेळाव्यात एकूण 291 विद्यार्थ्याची प्राथमिक निवड झाली.
मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळणार यशस्वी जीवनाचा मार्ग-माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी विद्यापीठाने हा एक चांगला पुढाकार घेतलेला आहे. अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाची सुरुवात होत असते, असे प्रतिपादन माजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे राज्यमंत्री मा. डी.पी. सावंत यांनी व्यक्त केले.या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. बालाजी मुधोळकर, प्रा. डॉ. बी सुरेंद्रनाथ रेड्डी, प्रा. डॉ. शैलेश वाढेर, प्रा. डॉ. कृष्णा चैतन्य, प्रा. डॉ. एल.एच. कांबळे, प्रा. डॉ. निना गोगटे, प्रा. डॉ. सुहास पाठक, प्रा. डॉ. अर्चना साबळे, प्रा. डॉ. योगेश लोलगे, प्रा.डॉ. महेश जोशी, प्रा. डॉ. काशिनाथ बोगले, प्रा. डॉ. राजकुमार मुन यांनी परिश्रम घेतले आहे.
Leave a Reply