Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॉडकास्टला (मुलाखत) सेनाप्रमुखांनी 12 तासातच उघड पाडले


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमॅनला रविवारी मिडीयावरील ट्रायपॉड ही मुलाखत दिली. 3 तास 17 मिनिटाच्या या मुलाखतीला भारताचे थल सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी मुलाखत किती खोटी आहे. आपल्या एकाच मुद्यातून दाखवून दिले. 2013 मध्ये अशी भाषणे केली गेली होती की, भारत कोणाच्या डोळ्यांना पाहुन भिणार नाही. कोणाला डोळे झाकून बोलणार नाही. पण प्रत्येकाला डोळ्यात-डोळे घालून बोलेल. हा प्रकार किती खोटारडा होता. हे 10 वर्षाच्या कालखंडातील ईतिहासाचा अभ्यास केला तर प्रत्येक भारतीयांच्या लक्षात येईल.

अमेरिकेतील एका मिडीयाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 3 तास 17 मिनिटांचा प्रॉडकास्ट अर्थात मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलतांना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, भारत आणि चिन या देशांमध्ये अनेक युगापुर्वीपासूनसंबंध आहेत. मागे कधी जगाच्या एकूण जीडीपीमध्ये भारत आणि चिन यांचा अर्धावाटा होता. भारत आणि चिन या दोन देशांमध्ये कोणताही संघर्षाचा ईतिहास घडलेला नाही. चिनमध्ये तथागत भगवान गौतम बुध्दांचा विचारांचा प्रभाव होता. तो विचार भारतातूनच तेथे गेला होता. आजपर्यंत कायम राहिलेले मजुबत संबंध भारत आणि चिनमध्ये पुढे सुध्दा राहतील असे सांगितले. दोन शेजारी देशांमध्ये काही ना काही घडत राहते. ते फक्त देशांमध्येच नव्हे तर कुटूंबामध्ये सुध्दा घडते असे मोदीजींनी मुलाखतीत सांगितले. कधी-कधी आपसात विचारांमध्ये जुळणी होत नाही. ते सहज शक्य आहे. पण आमचे अर्थात भारत आणि चिनचे मतभेद विवादात कधीच बदलले नाहीत. 2020 मध्ये भारत आणि चिनच्या सिमेवर घडलेल्या घटनेमुळै दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती झाली होती. वाचकांना आपल्या लक्षात आले काय? 2020 मध्ये काय झाले होते. त्यावेळी गलवान घाटीमध्ये चिनने भारतीय सैन्यातील 24 भुमिपूत्रांचा बळी घेतला होता आणि आपली हजारो चौरस फुट जमिनी अतिक्रमीत केली होती. तरी पण रविवारच्या मुलाखतीत सांगितले की, मी जेंव्हा शिंगला भेटलो म्हणजे चिनच्या राष्ट्रपतींना नरेंद्र मोदी यांना इतरांची नावे अर्धवट घेण्याचा अधिकार आहे ना म्हणून ते अशीच बोलतात. शिंगला भेटल्यानंतर तणावाची परिस्थिती आता निवळली आहे म्हणे असे मोदीची सांगतात. वाचकोंनो विचार करा.खरेच मागील पाच वर्षात भारत आणि चिनमध्ये असलेली तणावाची परिस्थिती निवळली आहे काय?

या मुलाखतीनंतर काही तासातच भारताचे थलसेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, चिन जागतिक स्तरावर भारताच्या भुमिकेत अनेकदा अडथळे आणत आहे. द्विवेदी यांनी सांगितले की, सांगाई संयोग संघटन (एससीओ) वर बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे. चिनने भारता विरुध्द तयार केलेल्या परिस्थितीनुसार भारताला आता अलर्ट मोडवर राहणे आवश्यक आहे. भारताला गुडघ्यांवर नव्हे तर पंजावर उभे राहून आपल्या डोळ्या तेल घालून देशाचा विचार करण्याची गरज आहे. असाच सेनाप्रमुखांच्या बोलण्याचा अर्थ आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरे तर ईतिहासाची माहिती नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरु असतांना चिनने भारताला हिंदी चिनी भाई-भाई अशा बोथट घोषणेची भुरळ टाकली होती. त्यावेळी नेहरुजींना वाटले की, आम्ही आताच स्वतंत्र झालो आहोत, दुर्बल आहोत, आमचा विकास आम्हालाच करायचा आहे आणि या परिस्थिती चिन आपल्याला भाऊ म्हणत आहे. यावर विश्र्वास करायला हवा. त्यावेळी चिनने पंचशिल तत्वांवर सुरा खुपसला. भारतावर हल्ला केला. भारताच्या शेजारी असलेला तिबेट लुटला ज्या ठिकाणी बौध्द धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा राहतात. चिनच्या त्रासाने त्यांना तिबेट सोडावे लागले. अनेक वर्ष त्यांनी भारतात राहून तिबेटचा कारभार चालवला. कुठे आहे चिनकडे तथागथांचा विचार याबाबत वाचकांनी स्वत: ठरवावे की, आम्ही काय लिहिले आहे. गलवानमध्ये भारताच्या 24 भुमिपूत्रांना आपला बळी द्यावा लागला तेंव्हा भारत सरकारने सांगितले की, त्यांनी आमचे 24 मारे तर आम्ही त्यांचे 45 मारले आहेत. खरे तर लाज वाटण्यासारखे वक्तव्य आहे. या चिनने एवढी धावासंख्या तयार केली. तर आम्ही त्यांच्याविरुध्द एवढी धाव संख्या तयार केली असे म्हणण्याचा हा प्रकार आहे काय? चिनचे किती सैनिक मरण पावले याबद्दल आम्हाला काही देणे-घेणे नाही. पण भारताचा एकही रक्षक तिरंग्यात गुंडाळून आला तर आमच्याच नव्हे तर प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा उभा राहिल. कलवानच्या घटनेनंतर एकाही सेन्यप्रमुखाने चिन आणि भारतातील परिस्थिती सामान्य आहे असे म्हटले नाही. चिनने नोमॅन्स लॅंडमध्ये घुसून भारताची जमीन नोमॅन्स लॅंड केली. आता आम्ही काय लिहावे वाचकांनो आपल्याला हा सर्व ईतिहास माहित आहे.

2014 मध्ये नरेंद्र मोदी म्हणत होते.आम्ही जर डोळे लाल करू तरी चिन मागे जाईल. मोदीजी आज तर चिन तुमचा मित्र आहे ना. परंतू खा.राहुल गांधी चिनच्या दुतावासामध्ये जातात तर म्हटले जाते शत्रुंची भेट घेत आहात. म्हणजे चिन तुमच्यासाठी मित्र आणि विरोधकांनी काही केले तर शत्रु हा दुप्पटीपणा नाही काय? चिन आणि मोदी यांचे व्यक्तीगत संबंध खुप जुने आहेत हे माहित आहे जगाला. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांना अनेकदा चिनला गेले आहेत. चिनमध्ये काही भारतीय तस्करांना पकडण्यात आले होते. त्यातील काही जणांना आपण आपल्या व्यक्तीगत मैत्रीमुळे सोडवून आणले आहे. काहींना चिनने शिक्षा दिली. आपले एवढे प्रेम आणि खा.राहुल गांधींची दुतावासाला भेट म्हणजे देशद्रोह हा दुप्पटीपणा नाही काय ? चिन सोबत आमचे संबंध चांगले आहेत हे सांगतांना त्या बालकांचा विचार करा ज्यांचे पालक त्यांनी गलवान घाटीमध्ये गमावले आहेत.

चिनकडे आज आर्थिक आणि सामाजिक शक्ती आहे. त्या जोरावरच ते वागत आहेत असे सेना प्रमुखांचे म्हणणे आहे. भारताच्या शेजारी असलेला नेपाळ, बांगलादेश भुटान, मॉरिशेष आणि श्रीलंका या सर्व देशांमध्ये चिनचा प्रभाव झाल आहे. हिंद महासागरात चिनचे गुप्तहेर जहाज फिरतात तो भारताला मोठा धोका आहे. तरी पण चिन भारताचा मित्र कसा आहे. जग भारताकडे पाहत आहे. असा खोटा प्रचार करून विश्र्वगुरू असल्याचे दाखवले जात आहे. सात लाखांची मुगल सेना असतांना छत्रपती शिवाजी राजे आणि इतर योध्यांनी काही हजार संख्येचे सैन्य बळावर मुगल सेना आडवी पाडली. ते छत्रपती खऱ्या अर्थाने होते विश्र्वगुरू. चिन आपला मित्र आहे तर गलवानची जमीन का परत आली नाही. का बैठका होत आहेत. चिनच्यावतीने ब्रम्हपुत्र नदीवर बनणारे धरण धोकादायकच आहे. तरी पण तुम्ही काही करत नाहीत. खऱ्या अर्थाने थलसेनाप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची एक भाषण लोकसभा आणि राज्यसभेत व्हायला हवे. कारण ते वाघ आहेत. वाघासारखीच डरकाळी ते फोडणार. खऱ्या अर्थाने भारत डोळ्यात-डोळे घालून बोलेल हा विनोद नव्हे काय वाचकांनो. कोणी तरी आम्हाला शोधून दाखवा भारताने कधी कोणाच्या डोळ्यात डोळे घालून बोलले आहे. एक जरी उदाहरण आम्हाला दिसले तर आम्ही आमच्या पत्रकारीतेला कायमचा रामराम करून टाकू.


Post Views: 25






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?