Advertisement

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम मेंदूचे विकार असणाऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबिरास २० मार्च पासून प्रारंभ


नांदेड-  येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम, एओसीएन इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने गत १४ वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबिर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या वर्षी २७ वे शिबिर गुरुवार दि. २० मार्च पासून शहराच्या मगनपुरा नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद  विद्यालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज व शाळेचे मुख्याध्यापक नितिन निर्मल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.

या वर्षी शिबिराचे हे पंधरावे वर्ष असून हे सत्ताविसावे शिबिर गुरुवार दिनांक २० ते २२ मार्च या कालावधीत मगनपुरा, नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात डॉ. अनैता हेगडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांची तज्ञ डॉक्टरांची  टिम रुग्णावर उपचार करणार आहे. आत्तापर्यंतच्या सव्वीस  आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचा तब्बल ७ हजारापेक्षा अधिक रुग्णांना लाभ झाला आहे. नेत्रशस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन असलेल्या रुग्णांना दृष्टी मिळाली तर हाडांच्या शस्त्रक्रियेनंतर उभे राहण्यास असमर्थ असणाऱ्या रुग्णांना आता चालता येऊ लागले आहे. अनेक रुग्णांचे चालताना तोल जाणे, फिट्स येणे व ऑटीझम अशा मेंदूशी संबंधित आजारातून आरोग्य शिबिरात घेतलेल्या सातत्याने उपचारामुळे बहुतांश जणांनी आजारावर मात केली आहे तर अनेक जन उपचाराने आजारातून बरे होणार आहेत. हे आरोग्य शिबिर मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरले आहे. या शिबिरात उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगाना येथील राज्यातूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. प्रतिआरोग्य शिबिरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने निवास व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. आदिवासी व दुर्गम असलेल्या किनवट तालुक्यातील रुग्णांकरिता दि. २० व २१ मार्च रोजी प्रथम येणाऱ्या १५ नोंदणीकृत रुग्णांची मोफत वाहतुकीची व्यवस्था साने गुरुजी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्ध सर्जन डॉ. अशोक बेलखोडे यांनी दिली आहे. या शिबिरात नेत्र तपासणीही करण्यात येणार असून आवश्यक असणाऱ्यांना लेन्सकार्ट कंपनीच्या वतीने चष्म्याचे वितरण करण्यात येणार आहे.   प्रतिवर्षाच्या शिबिराप्रमाणे या वेळीही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन व मुख्याध्यापक नितीन निर्मल यांच्या नेतृत्वात आर. आर. मालपाणी मतिमंद व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयातील कर्मचारी जय्यत तयारी करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

नविन रुग्णांनी त्वरित नोंदणी करावी
नवीन रुग्णांसाठी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी नवीन रुग्णांनी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय, मगनपुरा नवा मोंढा नांदेड येथे प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी तसेच शाळेत येणे शक्य नसणाऱ्या बाहेरगावच्या रुग्णांनी ८२०८११४८३२, ९०६७३७७५२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Views: 1






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?