नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे लोहा येथे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलानेच कार्यरत आहेत. वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर लिहिलेले वृत्त अर्धवट होते.
आज सकाळी वास्तव न्युज लाईव्हने पोलीस ठाणे लोहा येथे पोलीस निरिक्षक सदाशिव भडीकर यांची नियुक्ती झाली आणि पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांना बदली करुन कोठे पाठविले याची माहिती मिळाली नाही अशा आशयाची बातमी प्रसिध्द केली होती. मुळात हा सर्व प्रकार वास्तव न्युज लाईव्हला 15 मार्चच्या रात्री माहित झाला होता. पण बातमी लिहिण्यास उशीर झाला. आज सकाळी ही बातमी प्रदर्शित करण्यात आली. आज 16 मार्च रोजी दुपारनंतर घेतलेल्या माहितीनुसार लोहा पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक नागनाथ आयलानेच कार्यरत आहेत. म्हणून आम्ही लिहिलेल्या बातमीचे खुप खोलवर न लिहिता आम्हाला मिळालेली माहिती अर्धवट होती असे म्हणत आहोत. आज तरी लोहा पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक नागनाथ आयलानेच कार्यरत आहेत हे सत्य आहे.
Leave a Reply