मुंबई :- ट्रान्सजेंडर समाजाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या कार्यासाठी डॉ. सान्वी जेठवानी यांना ब्लूम ऑर्गनायझेशन, मुंबईतर्फे ब्लूम वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार ब्लूम संस्थेतर्फे कोविड काळापासून दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या योद्ध्यांना प्रदान केला जातो.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. जेठवानी यांनी प्रेरणादायी भाषण दिले. त्यांनी ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कांसाठी आपल्या संघर्षाचा आढावा घेतला आणि समाजाच्या स्वीकारावर महत्त्वपूर्ण विचार मांडले. या सन्मानामुळे ट्रान्सजेंडर हक्कांच्या चळवळीस नवा प्रेरणादायी संदेश मिळाला आहे.
या विशेष समारंभात विविध क्षेत्रातील नामांकित महिला उपस्थित होत्या. डॉ. सान्वी जेठवानी यांचा गौरव हा सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
Leave a Reply