नांदेड(प्रतिनिधी)-मौजे टाकळी ता.माहूर येथे घरफोडून चोरट्यांनी 7 लाख 13 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. मौजे गोकुंदा येथून एक घरफोडून चोरट्यांनी 72 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. एक सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्यांनी भावसार चौक नांदेड येथून 4 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तीन चोरी प्रकारात 12 लाख 66 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
मौजे टाकळी ता.माहूर येथील शेतकरी बाबाराव कोंडबाजी मुसळे हे 12 मार्च रोजी आपल्या शेतात गेले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी होती. त्यामुळे घराला कुलूप लावलेले होते. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि 7 लाख 13 हजार 800 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. माहूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 36/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक ब्राम्हण हे करीत आहेत.
रामकिशन संभाजी गेडाम हे आणि त्यांचे कुटूंबिय दि.11 मार्च रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. 12 मार्च रोजी परत आले तेेंव्हा त्यांचे घरफोडलेले होते. त्यांच्या घरातून 72 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरीला गेले होते. किनवट पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमंाक 70/2025 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वाढगुरे अधिक तपास करीत आहेत.
होळीच्या दिवशी दि.13 मार्च रोजी सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास भावसार चौक येथील माऊली ज्वेलर्स येथे एक हेल्मेट घातलेला व्यक्ती आला आणि पिवर सोने घ्यायचे आहे असे सांगून दुकानातील 9 तोळे सोन्याच्या पट्या व तुकडे चोरून नेले आहेत. या सर्व ऐवजाची किंमत 4 लाख 80 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 150/2024 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक देशमुख अधिक तपास करीत आहेत.
Leave a Reply