नांदेड -बुध्दगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने उद्या दि. 16 मार्च रोजी रविवारी दु. 12.00 वा. निर्धार बैठकीचे आयोजन त्रिरत्न विहार डॉ. आंबेडकर नगर, नांदेड येथे करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी दिली आहे.
इंग्रजकालीन बोधगया टेम्पल अॅक्ट 1949 रद्द करण्यात यावा. तसेच महाबोधी महाविहार व्यवस्थापन बौध्द भिक्षूच्या ताब्यात देण्यात यावे. आदी मागण्या घेवून नांदेड शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील आंदोलन अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक होणार आहे.या निर्धार बैठकीचे परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.राजू सोनसळे यांनी केले आहे.
Leave a Reply