Advertisement

जगात भांडवलशाही लवकरच संपणार; कार्लमार्क्समध्ये 1883 पुर्वी केली होती भविष्यवाणी


 

साम्यवादाचा आधार जगाला देणारे व्यक्तीमत्व कार्लमार्क्स.ज्या चिनमध्ये पुढे लोकांनी कार्लमार्क्सचे पुतळे पाडून टाकले आणि त्या विचारांची आम्हाला गरज नाही असे दाखवले असले तरी कोणत्याही विद्वानाचा विचार संपत नसतो. माणुस संपतो पण त्याने दिलेले विचार कधीच संपत नसतात. असाच प्रकार विचारवंत कार्लमार्क्स यांच्या संदर्भाने आज करण्याची वेळ आली आहे. जगातील भांडवलशाही लवकरच स्वत:च आपल्या मृत्यूकडे जाण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. डोनॉल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष जाहीर झाल्यापासून आजपर्यंत त्यांचे अत्यंत विश्र्वासू आणि जवळचे व्यक्ती इलॉन मस्क यांनी 18 हजार कोटी रुपये जमावले आहेत. खरे तर सर्वाधिक संपत्ती त्यांनी कमावायला हवी होती. परंतू त्यांचीच संपत आहे तर इतरांचे काय हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.

अमेरिकेचे शेअरबाजार 605 अंकांनी खाली आले आहे. भारताचा निफ्टी 6 टक्यांनी खाली पडला आहे. भारताचा संसेक्स 2 टक्यांनी खाली पडला आहे. इतर देशांमध्ये थायलंड 10 टक्के, टीएसआय इनडेक्स 7 टक्के, जकार्ता 5.7 टक्के, चिन 3.4 टक्के, युरोप 2.2 टक्के, जर्मनी 1.8 टक्के, जापान 1.5 टक्के, साऊथ कोरीया 1.9 टक्के आणि हॉंगकॉंग 2.3 टक्के अशा प्रकारे सर्व जगाच्या शेअर मार्केटमध्ये हाहाकार माजला आहे. या हाहाकाराचे कारण एकच आहे. होणाऱ्या उत्पादनाची खपत कमी झाली आहे आणि त्यातल्यात्यात भारताची अवस्था जास्त अवघड आहे.

कार्लमार्क्ससह इतर दार्शनिक सांगत होते की, जगाची भांडवलदारी आता स्वत:च आपल्या स्मशानाकडे जात आहे. 1883 मध्ये कार्लमार्क्स यांचा मृत्यू झाला. त्या अगोदरच त्यांनी ही भविष्यवाणी करून ठेवली होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे भांडवलशाहीचे एखाद्यावेळी बुम होते आणि काही दिवसातच तो फुगा फुटतो अशीच आजच्या शेअर बाजाराची परिस्थिती आहे. काही दिवसांपुर्वीच शेअर बाजारामध्ये बुम झाला होता आणि आता तो फुगा फुटला आहे. 99. टक्के पेक्षा जास्त संपत्ती 1 टक्के लोकांकडे आली आहे. सन 2008 मध्ये सुध्दा अशीच मंदी आली होती. त्यावेळी लोकांचे पगार वाढत नव्हते. नोकऱ्या कमी झाल्या होत्या. परंतू मोठ-मोठ्या कंपन्या मात्र भरपूर फायदा घेत होत्या. कार्लमार्क्सने सांगितले होते. अशा परिस्थितीमध्ये सरकारने ही परिस्थिती राखली नाही तर संपुर्ण व्यवस्था नष्ट होवून जाईल. जॉन मेनॉर्ड किन्स हे 1863 ते 1946 दरम्यानचे दार्शनिक आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने अशा परिस्थितीत गुंतवणूक करून लोकांना खर्च करण्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यायला हवे. कामगारांच्या माध्यमातून मोठ-मोठे भौतिक सुविधांचे प्रकल्प उभारायला हवे. ज्यातून जनतेला पैसा मिळेल आणि जनता तो पैसा आपल्या क्रयशक्तीसाठी उपयोग करेल. अमेरिकेने हा प्रकार करोना काळात केलेला आहे.

आजच्या परिस्थितीत चिन आपल्याकडील उत्पादनाची खपत वाढविण्यासाठी 3 कोटी 56 लाखांची सबसिडी देणार आहे. अशीच मदत अमेरिकेने सन 2008 आणि 2020 मध्ये केलेली आहे. थॉमस पिकेटी यांचा जन्म 1971 मध्ये झालेला आहे आणि आजही ते जीवंत आहेत. त्यांच्या सांगण्याप्रमाणे संपत्तीचे असमान वितरण हे भांडवल शाहीला मारुन टाकणार आहेत. एकूण सर्व दार्शनिकांचे म्हणणे कार्लमार्क्स यांच्या म्हणण्याच्या आसपासचे आहे. डेव्हीड हार्वे हे अर्थशास्त्रतज्ञ आहेत. त्यांनी सांगितले की, जगात क्रांती येईल. आजच्या परिस्थितीला आम्ही पाहतो तेंव्हा आम्ही क्रांतीच्या जवळ आलो आहोत. सरकार यात मदत करण्याऐवजी पैशांना काही लोकांकडे ढकलत आहे. आपल्या व्यक्तीगत कर भारतात अर्थात भारतातला आयकर मागील 10 वर्षामध्ये चार पट्टीने वाढला आहे आणि कारपोरेट कर 2 पटीने वाढला आहे. अमेरिकेत सुध्दा असेच झाले आहे. तेथे तर नोकरी करणारे इतर देशातील लोक सुध्दा बाहेर काढले जात आहेत. कंपन्या-भांडवलदार शेअर आपलेच परत घेत आहेत, त्यातच गुंतवत आहेत आणि पैसे कमावत आहेत. भारताच्या म्युचअल फंडचे आणि बॅंकांचे 6 हजार कोटी रुपये बुढाले आहेत. मागील 10 वर्षामध्ये देशातील 80 बॅंका बंद झाल्या आहेत. खरेदी दर उंच करण्याचा धंदा कंपन्याच करत आहेत. आपणच पैसे लावायचे आणि आपणच शेअरचे दर उंच करायचे आणि पुन्हा ते शेअर खरेदी करून दर पाडायचे असा धंदा भांडवलदार करत आहेत. त्यामुळे कामगारांकडे अर्थात सर्वसामान्य माणसांकडे पैसा उरलेला नाही. आजच्या परिस्थिती नोकरीवरून काढणे मालकांना सहज झाले आहे. कर यासाठी सरकारने कमी उत्पन्न असणाऱ्यांचे कर कमी करावेत. कर प्रक्रिया लवचिक करावी. जीएसटीवर एक्साईज ड्युटी कमी केली तर त्यात सुधारणा होईल.

ट्रिकल डाऊन ही अर्थशास्त्राची एक प्रक्रिया आहे. त्यानुसार सरकारने पैसा भांडवलदारांना द्यावा. त्यातून भांडवलदारांनी कारभार उभारावेत आणि रोजगार वाढेल. असे सरळसरळ दिसते. परंतू ही बाब जेंव्हा प्रत्यक्षात आली तेंव्हा काय झाले पाहा. या प्रक्रियेप्रमाणे 1980 ते आजपर्यंत अमेरिका व इतर भांडवलदार देशांनी काम केले. भांडवलदारांना मोठी सुट दिली. त्यांच्यासाठी सरकारने आपले खशनिजे उघडे केले आणि त्या पैशांचा उपयोग भांडवलदारांनी शेअरमार्केटमध्ये केला. त्यामुळे श्रीमंत जास्त श्रीमंत झाले आणि गरीब जास्त गरीब झाले. उत्पादनांची खपत कमी झाली त्यामुळे सरकारकडे पैसे येत नाही. त्यावेळेस भांडवलशाही वाढविण्यासाठी सुलभ कर्ज योजना आल्या. बनावट बाजार आला. सन 2000 मध्ये डॉटकॉल बबल आले. त्यामुळे रिअलइस्टेट या मार्केटला भाव आला. पण आजच्या परिस्थितीत घर खरेदी करणे अवघड झाले आहे. आज 90 टक्के सार्टऍप कंपन्या नुकसानीमध्ये आहेत असे अनेक खोटे बबल आणले गेले आणि ते बबल फुटले. नैसर्गिक पध्दतीने खपत वाढत नाही. या परिस्थितीत खरेदी अर्थ व्यवस्था खोट्या अर्थव्यवस्थैकडे जाणे सुरू झालीे आहे.

कार्लमार्क म्हणत होते हळूहळॅ क्रांती उभी राहिल. सरकारसाठी करायला भरून आहे. परंतू सरकारची इच्छा नाही आणि या परिस्थितीत अर्थव्यवस्था खोल दरीत जाणार हे सुनिश्चत झाले आहे. येत्या 10 ते 20 वर्षात कार्लमार्क्सने केलेली भविष्यवाणी खरी ठरेल आणि जगला विनाशापासून रोखणे अवघड होणार आहे. जगाचे जळू द्या आपल्या भारताचाच विचार करा वाचकांनो आपल्याला काय कराचे आहे.


Post Views: 41






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?