नांदेड(प्रतिनिधी)-लोणी (बु) ता.अर्धापूर येथे एका महिला पोलीस अंमलदाराने आपल्या तीन साथीदारांसह नातलगांना अत्यंत अश्लील शिवीगाळ करून पोलीसी हिसका दाखवते अशी धमकी दिल्यानंतर अर्धापूर पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अर्धापूर तालुक्यातील लोणी (बु) येथील सिंधुताई उत्तमराव फाटेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता त्यांच्या घरात अनाधिकृत प्रवेश करून देवानंद प्रभाकर भाटेकर, पोलीस अंमलदार कोकीळा प्रभाकर फाटेकर (नेमणूक पोलीस मुख्यालय,नांदेड), गोकर्णा प्रभाकर फाटेकर आणि सुरेखा देवानंद फाटेकर या चौघांनी सिंधुताई फाटेकरला आणि इतरांना शेत जमीनीच्या वादाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यातील पोलीस अंमलदार कोकीळा फाटेकर यांनी मी पोलीस आहे, पोलीसी हिसका दाखविल. शेती या शब्दातील शे या अक्षराचा उल्लेख जरी केला तर तुमच्या घराला बरबाद करून टाकील अशा धमक्या दिल्या. अर्धापूर पोलीस या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 115(2), 329(4), 351(2), 3(5)प्रमाणे महिला पोलीसासह चार जणांविरुध गुन्हा क्रमांक 150/2025 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Leave a Reply