नांदेड(प्रतिनिधी)-मुख्यमंत्र्याचे आदेश न मानता, त्यांच्या अधिकारात जाणून बुजून हस्तक्षेप केल्याप्रकरणी सध्या जिल्हा कारागृह उपअधिक्षक पदावर कार्यरत असलेले नांदेड येथील ज्ञानेश्र्वर हरीभाऊ खरात यांना गृहविभागाने शासन सेवेतून निलंबित केले आहे. या आदेशावर शासनाचे सहसचिव सुग्रिव धपाटे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या शासन आदेशानुसार ज्ञानेश्र्वर हरीभाऊ खरात यांची अधिक्षक जिल्हा कारागृह वर्ग-2/ उपअधिक्षक मध्यवर्ती कारागृह गट ब या संवर्गात अधिक्षक मोर्शी खुले कारागृह येथे पदस्थापना देण्यात आली होती. मात्र त्यांनीच 25 फेबु्रवारी रोजी शासनाच लिहिलेल्या पत्रानुसार ते जिल्हा कारागृह वर्ग-2 नांदेड या पदावर कार्यरत असल्याचे दिसले.
दि.11 फेबु्रवारी 2025 रोजी संपत हामु आडे यांची जिल्हा कारागृह वर्ग-2 नांदेड येथे अधिक्षक जिल्हा कारागृह या पदावर पदोन्नती देवून पदस्थापना देण्यात आली. परंतू आडे नांदेडला आले असतांना त्यांना त्या पदावर रुजू न करून घेता ज्ञानेश्र्वर खरात यांनी उपअधिक्षक या पदावर 19 फेबु्रवारी रोजी रुजू करून घेतले. तसेच आडे यांना विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह यांचे स्विय सहाय्यक यशवंत सानप यांच्या पत्राद्वारे बेकायदेशीरपणे लातूर येथील प्रतिनियुक्तीचा पदावर रुजू होण्यासाठी 25 फेबु्रवारी रोजी कार्यमुक्त केले.
ज्ञानेश्र्वर खरात यांनी मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन आणि शासनाच्या अधिकारात हस्तक्षेप केला ही बाब अत्यंत गंभीर व अक्षम्य आहे. राजपत्रीत अधिकाऱ्याला असे करणे शोभनिय नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक), नियम 1979 च्या नियम 3 चे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन आदेश अस्तित्वात असे पर्यंत ज्ञानेश्र्वर हरीभाऊ खरात यांना मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे हजेरी देणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नांदेडचे माजी कारागृह अधिक्षक खरात निलंबित –

Leave a Reply